मी दहशतवादी असल्याचे भारताने सिध्द करावे : हाफिज सईद

Last Updated: Thursday, August 15, 2013, 16:39

मुंबई आणि दिल्ली हल्ल्यातील अतिरेकी हाफिज मोहम्मद सईद याने भारताला खुले आव्हान दिले आहे. मी दहशतवादी आहे, हे भारताने सिद्ध करून दाखवावे, असं हाफिजने म्हटलं आहे. पाकिस्तान आणि भारताच्या न्यायधीशांकडून स्वतंत्र्य चौकशी केली जावी. मी दहशतवादी आहे हे सिध्द करावे, हे सईद आव्हान देताना सांगितलं.

दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा मृत्यू

Last Updated: Thursday, August 15, 2013, 15:09

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू साथीदार आणि मुंबईमधील १९९३ च्या बॉंबस्फोटांमधील प्रमुख आरोपी इक्बावल मिर्ची याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिर्चीचा लंडनमधे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

स्वातंत्र्यदिन : ब्रिटिश पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा

Last Updated: Thursday, August 15, 2013, 12:32

देशात ठिकठिकाणी भारताचा ६७ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातोय... एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारतीयांना याच दिवसाच्या शुभेच्छा ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनीही दिल्यात.

वेगाची नवी ओळख : हायपरलूप

Last Updated: Thursday, August 15, 2013, 11:16

मानवाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे आणि त्यातूनच ‘हायपरलूप’ची अनोखी कल्पना पुढं आली आहे.

आई- मुलगीही `एकावर एक` फ्री!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 20:30

बाजारात किंवा मॉलमध्ये अनेक गृहोपयोगी वस्तूंसाठी एकावर एक फ्रीची ऑफर देऊन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचं काम अनेक कंपन्या करत असतात. मात्र अशीच जाहिरात वेश्याव्यवसायासाठीही वापरणाऱ्या आई-मुलीला अटक करण्यात आलं आहे.

लेडी गागाची `नग्न योगासनं,`हिंदूंची दुखावली मनं!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 20:08

अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.

मंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 13:04

मंगळावर जाण्यासाठी आतापर्यंत १ लाख लोकांचे अर्ज आले आहेत. कोट्यावधी डॉलर खर्चून या लाल ग्रहावर राहायला जाण्यासाठी हे अर्ज आले आहेत. ‘द मार्स वन’ नावाच्या या योजनेची सुरुवात २०२२ मध्ये होणार आहे.

नरेंद्र मोदी निघाले लंडनला!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 11:37

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून काही भारतीय खासदारांनी फिल्डींग लावली. यावरून बराच वाद झाला. तर कट्टर हिंदूत्ववादी मोदी आहेत, असा ठपका ठेवत काही देशांनी मोदींना परदेश बंदी केली. मात्र, आता ब्रिटनने मोदींना व्हीसा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे मोदींचा लंडन प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अण्णांचा स्वातंत्र्यदिन... न्यूयॉर्कमध्ये होणार साजरा!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 08:34

भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आपला यंदाचा स्वातंत्र्यदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करणार आहेत.

चीनमध्ये ‘नग्न विवाहा’ला मिळतेय प्रचंड मान्यता!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 07:57

चीनमध्ये विवाहाच्या एका नव्या प्रथेला झपाट्यानं लोकप्रियता मिळतेय. हा विवाह म्हणजे ‘नग्न विवाह’. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हे तथ्य पुढं आलंय.