गुगल कंपनीची आता चालकरहित रोबोट टॅक्सी

Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:06

आता येणार चालकरहीत टॅक्सी... आश्चर्यचकीत करणारी ही चालकरहित रोबो टॅक्सी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणारी गुगल कंपनी अशी टॅक्सी विकसीत करणार आहे. या टॅक्सीमुळे अपघाताची संख्या कमी होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून त्याच्या फायदा होणार आहे, हा मुळ हेतू लक्षात घेऊन गुगल कंपनी ही टॅक्सी तयार करणार आहे.

सर्व मशिदी दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 19:23

पोलिसांना मशिदीत चालणाऱ्या धार्मिक चर्चा, धार्मिक शिकवण्या रेकॉर्ड करण्याचा अधिकार मिळेल. तसंच कुठल्याही इमामाची हेरगिरी करण्याची सूटही मिळेल.

१० वर्षीय मुलीने केलं ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 16:41

ऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक शोषणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. मेलबर्न शहरात एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आलं.

विवाह कुत्र्यांचा! पण रागवलं लंकन सरकार!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 14:45

श्रीलंकन पारंपरिक विवाह पद्धतीचा लंकन पोलिसांनी अपमान केला, असं म्हणत श्रीलंकन सरकारनं कुत्र्यांच्या विवाहावर नाराजी व्यक्त केलीय. लंकेतल्या पोलिसांनी घेतलेल्या कुत्र्यांच्या जोपड्यांचं तिथल्या पारंपरिक पद्धतीनं विवाह लावून दिला होता.

सीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 13:57

सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.

‘अलेक्झांडर द ग्रेट’ची कबर सापडली!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 13:06

‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणून ओळखला जाणारा ग्रीसचा जगज्जेता सिकंदर याची कबर सापडल्याची बातमी आहे. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अथेन्सजवळ सापडलेला चौथ्या शतकातील उंबरठा अलेक्झांडरच्या कबरीशी साधर्म्य दाखवत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असंही ग्रीस सरकारनं स्पष्ट केलंय.

सीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 12:51

सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.

मुंबईत बंद, अमेरिकेत अजूनही ‘ड्राइव्ह इन सिनेमा’ सुरू

Last Updated: Monday, August 26, 2013, 18:21

मुंबईमध्ये वांद्रयात असणारं एकमेव ड्राइव्ह इन थिएटर बंद पडलं आहे. मात्र अशी ड्राइव्ह इन थिएटर्स अमेरिकेत अजूनही सुरू आहेत. या थिएटर्समध्ये आजही मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

बौद्धांनी जाळली मुस्लिम धर्मियांची घरं

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 16:32

धार्मिक अशांतीचं लोण म्यानमारमध्येही पसरलेलं आहे. म्यानमारमध्ये बौद्धांच्या एका संघाने मुस्लिम धर्मियांची घरं आणि दुकानं जाळली आहेत.

सीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी

Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:21

दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय