हृदय बंद पडलं तरी घाबरू नका, जीवंत करणार यंत्र!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 13:13

आता मृत्यूवर मात करता येणं आजच्या तंत्राच्या युगात शक्य झालं आहे. हे वाचून तुम्हाला अजब वाटलं ना. मात्र, ही बाब खरी आहे. लंडनमधील डॉक्टरांनी ते शक्य करून दाखवलं आहे. एक्ट्राकॉरपोरियल मेंब्रान ऑक्सीजनरेशन (ईसीएमओ) या मशिनच्या माध्यमातून बंद पडलेलं हृदय पुन्हा कार्यरत करता येतं.

चिमणीतून काळा धूर, अजूनही पोपची निवड नाहीच

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 12:55

आगामी पोप कोण असणार हे भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीपर्यंत ठरू शकलेलं नाही. बेनेडिक्ट १६वे यांच्या राजीनाम्यानंतर पुढील पोप कोण असणार याबाबत निवडणुक प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

भारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 13:32

भारतीय ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’चे (डीआरडीओ) शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं उघड झालंय. चीनच्या ‘हॅकर्स’नी हा प्रताप केलाय.

`फायर आइस`चा शोध... जपानला संजीवनी!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 10:23

जपानच्या वैज्ञानिकांनी समुद्रतळाच्या तळाशी जाऊन ‘मिथेन हायड्रेट’ नावाचा गॅस शोधून काढलाय. याचा फायदा येणाऱ्या शंभर वर्षांपर्यंत इंधन म्हणून केला जाऊ शकतो, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केलाय.

...अशी होते नव्या `पोप`ची निवड!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 07:54

पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या ऐतिहासिक राजीनाम्यानंतर रोममधल्या व्हॅटिकन सिटीत नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यासाठी मतदानाचा अधिकार असलेले जगभरातले १२० कार्डिनल्स इथं दाखल झालेत.

वीकेण्डला मुलीवर केला ९० जणांनी बलात्कार

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 16:01

ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सुमारे एक आठवडा ९० जण बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचं वय अवघं १६ वर्षं आहे.

नव्या पोप पदासाठी निवड प्रक्रिया सुरू

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 15:50

व्हॅटिकन सिटीमध्ये आज नव्या पोप निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.

नौसैनिकांना धाडणार नाही; इटलीचं भारताला आव्हान

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 11:33

भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.

८ वर्षांच्या मुलाने केलं ६१ वर्षांच्या बाईशी लग्न!

Last Updated: Monday, March 11, 2013, 16:04

दक्षिण आफ्रिकेमध्ये आठ वर्षांच्या मुलाचं ६१ वर्षीय महिलेशी लग्न लावण्यात आलं. शाळेमध्ये शिकणार ८ वर्ष सनेल मसिलैला याचं त्याच्याहून वयाने कित्येक वर्षं मोठी असणाऱ्या ६१ वर्षीय हेलन शबंगु हिच्याशी विवाह झाला. हेलन स्वतः ५ मुलांची आई आहे.

नरेंद्र मोदींचे अखेर अमेरिकेत झाले भाषण

Last Updated: Sunday, March 10, 2013, 12:31

वॉर्टन इंडिया ईकॉनॉमिक फोरमने निमंत्रण नाकारल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिकेतील भारतीय जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा किती महत्वाचा आहे, याबाबत नागरिकांशी संवाद साधला. त्याचबरोबर जगात कुठेही जा, पण आपल्या जन्मभूमीशी, आपल्या मातीशी नाळ कायम ठेवा, असं आवाहन मोदींनी केलं.