भूपती-बोपन्नावर दोन वर्षांची बंदी

Last Updated: Sunday, September 16, 2012, 20:40

महेश भूपती आणि रोहन बोपन्ना या भारतीय टेनिस जोडीवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया टेनिस असोसिएशन’नं घेतला आहे. जो पर्यंत भारत डेव्हिस कपच्या एशिया ओशियाना ग्रुपमध्ये दाखल होत नाहीत, तोपर्यंत या दोघांना टीममध्ये संधी देण्यात येणार नाही.

ब्रिटनची स्वप्नपूर्ती : अॅन्डी मरेनं जिंकलं अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 08:22

अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅमवर ब्रिटनच्या अॅन्डी मरेनं आपलं नाव कोरलंय. मरेनं नोवाक जोकोव्हिचला ७-६, ७-५, २-६, ३-६, ६-२ अशा पाच सेट्समध्ये पराभूत केलंय.

युएस ओपन फायनलमध्ये जोकोविच-अँडी मरे

Last Updated: Monday, September 10, 2012, 13:28

डिफेंडिंग चॅम्पियन नोवाक जोकोविचने फोर्थ सीडेड स्पॅनिआर्ड टेनिस प्लेअर डेव्हिड फेररचा 2-6, 6-1, 6-4, 6-2ने पराभव करत दिमाखात तिस-यांदा फायनल गाठली.पावसाने धुमाकूळ घातलेल्या युएस ओपन फायनलमध्ये जोकोविचसमोर आव्हान असणार आहे ते लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणा-या अँडी मरेचं.

पेस-स्टेपनेक यूएस ओपनचे उपविजेते

Last Updated: Saturday, September 8, 2012, 08:21

अमेरिकन ओपनमध्ये लिएँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपनेकला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं.

यूएस ओपन : पेस-स्टेपनेक फायनलमध्ये

Last Updated: Friday, September 7, 2012, 14:12

लिएंडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपनेकनं अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

विजयकुमार, योगेश्वरला खेलरत्न पुरस्कार

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 21:38

विजय कुमार आणि योगेश्वर दत्तला राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 7.5 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे.

मेरी कोमचे नाव मणिपूरमधील रस्त्याला देणार

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 15:52

मणिपूर शासनाने चूडाचांदपूर जिल्ह्यातील एका रस्त्याला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एमसी मेरीकोम हिचे नाव दिले.

धोनीची नवी इनिंग; बनणार ‘सुपर बाईक चॅम्पियन’?

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 13:38

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं क्रिकेटव्यतिरिक्त ‘बाईक्स’चं प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. त्याचं हेच वेड त्याला घेऊन चाललंय मोटर रेसिंगच्या जगात! 2013मध्ये होणाऱ्या ‘सुपर बाइक चॅम्पियनशीप’च्या निमित्तानं धोनी एका नव्या इनिंगला प्रारंभ करतोय.

'अर्जुन' पुरस्काराचे मानकरी!

Last Updated: Monday, August 20, 2012, 10:51

कविता राऊतसह, सुधा सिंग, नरसिंग यादव,आदित्य मेहता हे महाराष्ट्राचे चार खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरलेत. रविवारी, राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची केंद्रीय क्रीडा खात्याने अधिकृत घोषणा केलीय.

सचिनच्या हस्ते सायनाला बीएमडब्ल्यू भेट

Last Updated: Sunday, August 19, 2012, 21:19

हैद्राबादमध्ये सचिनच्या हस्ते सायना नेहवालचा सत्कार करण्यात आला. तसंच सायनाला बीएमडब्ल्यू कारही भेट देण्यात आली.