वेध लंडन ऑलिम्पिकचे...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 09:57

ऑलिम्पिकला उरलाय केवळ एक महिना... १३ गेम्समध्ये भारताची दावेदारी... मेडल्ससाठी झुंजणार तब्बल ८१ भारतीय प्लेअर्स ... लंडन ऑलिम्पिकचं काऊंटडाऊन सुरु झालंय...

अरे....विम्बल्डनमध्ये मिनी स्कर्टला बंदी?

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 18:42

विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे सुमारे दीड शतकापासून आयोजन करणार्‍या ऑल इंग्लड क्लबने यंदा आपल्या कर्मचार्‍यांसाठी ‘ड्रेस कोड’ तयार केला असून, त्यामुळे आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला कर्मचार्‍यांसाठी मिनी स्कर्ट घालण्यास बंदी घालण्यात आली आहे

व्हिनसचा विम्बल्डनमधील गाशा गुंडाळला

Last Updated: Monday, June 25, 2012, 21:07

पाचवेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या व्हिनस विल्यम्सवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. रशियाच्या एलिना वेसनिनाने ३२ वर्षीय व्हिनसला ६-१ , ६-३ असे सहज नमविले. १९९७ मध्ये विम्बल्डन पदार्पण करणाऱ्या व्हिनसला पंधरा वर्षांत प्रथमच पहिल्या फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.

इंग्लंडची निश्चयाची माती केली रे माती....

Last Updated: Monday, June 25, 2012, 19:35

हाय वोल्टेज मॅचमध्ये इटलीनं पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला ४-२ नं पराभूत करत युरो कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या पराभवासह इंग्लिश टीमचं पुन्हा एकदा क्वार्टर फायनलमध्येच पॅकअप झालं.

ग्रास कोर्टवर अव्वल टेनिसपटू आमने-सामने

Last Updated: Monday, June 25, 2012, 18:06

मातीच्या कोर्टवरील लढाईनंतर आता अव्वल टेनिसपटू ग्रास कोर्टवर आमने-सामने येणार आहेत. नोव्हा जोकोविच, राफाएल नादाल आणि रॉजर फेडरर यांच्यामध्ये खर युद्ध रंगणार आहे. तर ग्लॅमरस मारिया शारापोव्हा सेंटर कोर्टचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भारतीय टेनिसपटूंच्या कामगिरीवरही सा-यांचच लक्ष असणार आहे.

अॅथलेटिक्‍स अंजू जॉर्ज करणार पुनरागमन

Last Updated: Sunday, June 24, 2012, 17:44

भारताची ऍथलेटिक्‍स अंजू जॉर्ज हैदराबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराज्यीय अॅथलेटिक्‍स स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. तिच्या नव्याने मैदानात येण्यामुळे पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

वा...वा.. मराठी माणूस विम्बल्डनचा रेफ्री!!!

Last Updated: Saturday, June 23, 2012, 23:49

टेनिसची पंढरी मानल्या जाणा-या विम्बल्डनसह चारही ग्रँड स्लॅममध्ये गेली जवळपास 18 वर्ष नितिन कन्नमवार भारताचं प्रतिनिधित्व करताहेत. नितिन कन्नमवार हे जागतिक दर्जाचे टेनिस रेफ्री असून ते जगभरातील महत्त्वाच्या टूर्नामेंटमध्ये रेफ्रीची भूमिका चोख बजावताहेत.

जोकोविचचा मराठमोळा डॉक्टर...

Last Updated: Saturday, June 23, 2012, 16:22

जोकोविचच्या या यशात मोलाचा वाटा राहिला तो एका मराठमोळ्या डॉक्टरचा. मुंबईच्या डॉक्टर श्रीपाद खेडेकरांच्या होमिओपॅथी उपचारांमुळेच जोकोविचला आपल्या दम्यावर नियंत्रण मिळवता आलं.

रणनीती कामी: सेमीफायनलमध्ये जर्मनी

Last Updated: Saturday, June 23, 2012, 09:05

२००८ ची फायनलिस्ट असलेल्या जर्मनीनं युरो कपच्या सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. जर्मनीच्या टीमनं ग्रीसचा ४-२ नं पराभव केलाय. जोकोमी लो यांच्या अफलातून रणनीतीच्या जोरावर जर्मनीच्या टीमला हा विजय साकारता आला.

रोनाल्डोचा गोल... पोर्तुगालचा रॉक अॅन्ड रोल…

Last Updated: Friday, June 22, 2012, 11:00

युरो कप २०१२ च्या गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं केलेला गोल मॅचचा निर्णायक गोल ठरला. आणि पोर्तुगालनं चेक गणराज्यला १-० फरकानं हरवलं... या विजयामुळे पोर्तुगालनं युरोकपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय.