मय्यप्पन निलंबित, चेन्नईत मुंबई पोलिसांचा छापा

Last Updated: Sunday, May 26, 2013, 13:43

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन याचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर चेन्नईत छापा मारला.

फिक्सिंगबाबत नवा कायदा आणणार - सिब्बल

Last Updated: Sunday, May 26, 2013, 07:57

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील `स्पॉट फिक्सिंग`चा घोडेबाजार उघड झाल्याच्या पार्श्ववभूमीवर केवळ क्रिकेटच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधील अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी एक स्वतंत्र आणि सर्वंकष नवा कायदा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.

निराश द्रवीड निवृत्तीच्या विचारात!

Last Updated: Saturday, May 25, 2013, 19:06

वादांत अडकलेल्या राजस्थान रॉयल्सचा या सत्रातील कॅप्टन आणि भारताचा अनुभवी राहुल द्रवीडला आयपीएलमधून संन्यास घ्यायचाय.

मयप्पन पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत

Last Updated: Saturday, May 25, 2013, 17:24

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ मेपर्यंत मयप्पन पोलीस कोठडीत राहणार आहे.

मी राजीनामा देणार नाही - श्रीनिवासन

Last Updated: Saturday, May 25, 2013, 14:09

श्रीनिवासन यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा निश्चित मानण्यात येतोय. त्यामुळं त्यांच्या जागेवर आता प्रभारी अध्यक्षाची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेत श्रीनिवासन यांनी बीसीसीआयला पेचात टाकलं आहे.

श्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?

Last Updated: Saturday, May 25, 2013, 12:25

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सट्ट्यात २० लाख रूपये हरलो - मयप्पन

Last Updated: Saturday, May 25, 2013, 08:39

तब्बल तीन तासांच्या कसून चौकशीनंतर बेटींग प्रकरणी गुरूनाथ मयप्पन यांना अटक करण्यात आलीये सट्ट्यात २० लाख रूपये हरल्याची कबुली मयप्पननं दिलीय.

मुंबईची राजस्थानवर मात, अंतिम फेरीत धडक

Last Updated: Saturday, May 25, 2013, 07:52

कोलकाता - अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत ड्वेन स्मिथच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सचा ४ विकेट आणि एक बॉल राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सहाव्या पर्वात फायनलमध्ये धडक मारली. रविवारी रंगणार फायनल लढतीत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान असणार आहे.

तीन तासांच्या चौकशीनंतर मयप्पनला अटक

Last Updated: Saturday, May 25, 2013, 00:00

स्पॉट फिक्संग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा गुरुनाथ मयप्पन याला तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलंय.

मयप्पन आणि विंदूची समोरासमोर होणार चौकशी

Last Updated: Friday, May 24, 2013, 21:39

मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सला उत्तर देताना गुरुनाथ मयप्पन आज मुंबई पोलिसांसमोर दाखल झालेत.