सलमान संजयला म्हणतोय `चल मेरे भाई...`?, When Salman Khan met friend Sanjay Dutt

सलमान संजयला म्हणतोय `चल मेरे भाई...`?

सलमान संजयला म्हणतोय `चल मेरे भाई...`?
www.24taas.com, मुंबई

सुप्रीम कोर्टानं १९९३ सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल दिल्यानंतर अभिनेता संजय दत्त काळजीत आहे. त्याला सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी ५ वर्षाची शिक्षा सुनावलीय. यानंतर संजयची अनेक नेत्या-अभिनेत्यांनी भेट घेतली. पण, या सगळ्यामध्ये संजयसाठी खास भेट ठरली ती अभिनेता सलमान खानची.

सध्या, सलमान खानही काळवीट शिकार प्रकरण तसंच हिट अॅन्ड रन प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू असल्याचनं अडचणीत आहे. गुरुवारी जोधपूर न्यायालयात मेडिकल सर्टिफिकेट देऊन सलमाननं सुनावणीला जाणं टाळलं असलं तरी लगेचच दुसऱ्या दिवशी तो मुंबईमध्ये दाखल झाला. यानंतर सलमाननं पहिल्यांदा जाऊन संजूबाबाची भेट घेतली. सलमान लगोलग संजयच्या पाली हिलच्या घरी दाखल झाला. अर्थातच ही भेट संजयला 'चल मेरे भाई...' म्हणत आयुष्यात पुढे चालत राहण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी होती.

रिअलिटी शो `बिग बॉस`च्या पाचव्या सीझन सलमाननं आपला मित्र संजय दत्त याच्यासोबत होस्ट केला होता. याच कार्यक्रमात सलमान संजयला ‘बडा भाई’ किंवा ‘बाबा’ म्हणून संबोधत असे. बिग बॉसशिवाय या दोघांनी साजन, चल मेरे भाई हे सिनेमे एकत्र केले होते. तसंच या दोघांचा ‘दस’ हा सिनेमा लवकरच प्रकाशित होणार आहे.

First Published: Tuesday, March 26, 2013, 14:32


comments powered by Disqus