‘संजय दत्तऐवजी मला तुरुंगात टाका…’, RAKHI IS READY TO GO IN JAIL FOR SANJAY DUTT

‘संजय दत्तऐवजी मला तुरुंगात टाका…’

‘संजय दत्तऐवजी मला तुरुंगात टाका…’
www.24taas.com, मुंबई

संजय दत्त याला सुप्रीम कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर अवघं बॉलिवूड दु:खी झालंय. अनेकांनी संजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि आपलं दु:ख व्यक्त केलं. याच दु:खीतांमध्ये आयटम गर्ल राखी सावंतचं नाव सर्वात अगोदर घ्यावं लागेल. कारण, राखी संजयसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार झालीय.

शक्य असेल तर संजय दत्तच्याऐवजी मी जेलमध्ये जायला तयार आहे, असं राखीनं म्हटलंय. राखी म्हणते, ‘मला माहीत आहे की संजय दत्तचं लग्न झालेलं आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नी आणि मुलांची जबाबदारी आहे. संजयला तुरुंगात जावं लागलं तर त्याच्याबरोबर ही शिक्षा त्याच्या परिवारालाही भोगायला लागणार आहे’.

‘मी एकटीच आहे. जर कायद्यानं परवानगी दिली आणि माझ्या आईनं परवानगी दिली तर मी संजयची शिक्षा भोगायला तयार आहे’ असं राखीनं म्हटलंय. राखीच्या म्हणण्यानुसार, तिच्यासाठी बाहेरचं जग आणि तुरुंगातलं जग एकसारखंच आहे.

First Published: Tuesday, March 26, 2013, 16:08


comments powered by Disqus