औचित्य ऑनलाइन अंकाचे, Zee 24 taas online diwali issue

औचित्य ऑनलाइन अंकाचे

औचित्य ऑनलाइन अंकाचे

मराठीत दरवर्षी दिवाळी अंकाच्या रुपाने दर्जेदार साहित्य तयार होत असतं. महाराष्ट्रातील मराठी साहित्य प्रेमींना याचा आस्वाद घेणे शक्य असते. पण महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांना ऑनलाइनच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य फारच कमी प्रमाणात पोहचते. तसेच आजकालच्या धावपळीच्या युगात दिवाळी अंक विकत घेऊन वाचण्यासाठी मराठी माणसाला वेळ नाही. तर असे साहित्य चालता-बोलता मोबाईलवर, ऑफिसमध्ये काम करताना डेस्कटॉपवर वाचता यावा, ही आज काळाची गरज आहे.

मराठी नेटीझन्सना दिवाळी निमित्त दर्जेदार साहित्य मिळावे हाच झी २४ तासचा उद्देश आहे. 24taas.com च्या माध्यमातून झी मीडिया ऑनलाइन दिवाळी अंक देण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत!
आणि हो, तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा....

धन्यवाद

प्रशांत जाधव
संपादक, 24taas.com

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 1, 2013, 22:48


comments powered by Disqus