Last Updated: Tuesday, December 18, 2012, 23:40
www.24taas.com, मुंबईमायानगरीत महिलांच्या सुरक्षिततेचा बोजवारा उडला असल्याचं पोलिसांच्या दफ्तरावर नजर टाकल्यास लक्षात येईल.. गेल्या पाच वर्षातील ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.
गेल्या काही महिन्यात मायानगरी मुंबई महिला असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय...अपहरण, बलात्कार,खून, लैंगिक छळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांना लक्ष्य केलं जातंय...गेल्या पाच वर्षातील मुंबईची आकडेवारी पहाता मायानगरीत महिला किती असुरक्षित आहेत हे सहज लक्षात येईल ..
2011
-------
एकूण गुन्हे 32,647
2011
-------
महिलांविषयीचे गुन्हे 32,647
5 वर्षात महिलांविषयीच्या गुन्ह्यात 26% वाढ
ही आकडेवारी पहाता मुंबईत महिलांच्या सुरक्षेची अवस्था किती केविलवाणी झालीय हे लक्षात येईल. गेल्या पाच वर्षात मुंबईत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय..
2007
------------
174 गुन्हे
2008
------------
218 गुन्हे
2009
------------
182 गुन्हे
2010
------------
194 गुन्हे
2011
------------
221 गुन्हे
दरवर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढ होत गेल्याचं पहायला मिळेल...बलात्काराप्रमाणेच गेल्या पाच वर्षात विनयभंगाच्या घटनांही वाढल्या आहेत...
2007
------------
365 गुन्हे
2008
------------
436 गुन्हे
2009
------------
400 गुन्हे
2010
------------
475 गुन्हे
2011
------------
553 गुन्हे
विनयभंगाप्रमाणेच लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत....
लैंगिक छळ
2007
------------
112 गुन्हे
2008
------------
121 गुन्हे
2009
------------
101 गुन्हे
2010
------------
138 गुन्हे
2011
------------
162 गुन्हे
विनयभंग, लैंगिक छळ, बलात्काराच्या घटनांप्रमाणेच अपहरणांच्या घटनांची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे....
अपहरण
2007
------------
120 गुन्हे
2008
------------
116 गुन्हे
2009
------------
86 गुन्हे
2010
------------
146 गुन्हे
2011
------------
266 गुन्हे
मुंबईत महिला किती असुरक्षित आहेत हे गेल्या पाच वर्षात बळी पडलेल्या महिलांच्या संख्येवरुन तुमच्या लक्षात येईल...
खून
2007
------------
230 गुन्हे
2008
------------
210 गुन्हे
2009
------------
217 गुन्हे
2010
------------
228 गुन्हे
2011
------------
203 गुन्हे
महिलांना केवळ गुन्हेगारांकडून लक्ष्य केलं जातंय असं नाही तर कौटुंबीक वादातूनही त्यांनना छळ सहन करावा लागतोय...
पती आणि नातेवाईकांकडून छळ
2007
------------
380 गुन्हे
2008
------------
502 गुन्हे
2009
------------
434 गुन्हे
2010
------------
312 गुन्हे
2011
------------
393 गुन्हे
मुंबईतील ही आकडेवारी पहाता...पोलीस यंत्रणा काय करतेय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्या शिवाय रहणार नाही..
रविवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान देशाची राजधानी दिल्लीत एक भयंकर घटना घडली... सार्वजनिक वाहतूक करणा-या बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला....या घटनेमुळे सगळा देश हादरुन गेलाय..
सीसीटीव्ही कॅमे-याने टीपलेल्या या दृश्यात दिसत असलेल्या दिल्लीतील याच बसमध्ये संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडलीय. देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात वर्दळीचा समजल्या जाणा-या परिसरात एक तरुणीवर सामुहिक बलात्काराची घटना घडलीय...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राफिक्स इन - राम सिंह नावाचा आरोपी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून तो मुळचा राजस्थानचा रहिवासी आहे..सध्या तो दिल्लीतील आर.के. पुरम झोपडपट्टीत राहत असून पेशाने तो ड्रायव्हर आहे...जेव्हा आरोपींनी त्या पीडित तरुणीवर बलात्कार केला तेव्हा आरोपी राम सिंहचा भाऊ बस चालवित होता...
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी बसमध्ये बसल्यानंतर आरोपींनी तिची छेड काढण्यास सुरुवात केली.. तिच्या सोबत असलेल्या तरुणाने आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी त्या दोघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली..त्यानंतर आरोपींनी त्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला..
दिल्लीतील उच्चभ्रू समजल्या जाणा-या परिसरात रात्री सव्वा नऊ ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली..पीडित तरुणी पॅरा मेडिकलची इंटर्नशीप करण्यासाठी दिल्लीत आली होती..रात्री सा़डे आठ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत साकेतहून सिनेमापाहून घरी परतत होती..त्यांना मुनिरकापर्यंतच रिक्षा मिळाली..त्यामुळे त्यांनी नजफगडला जाण्यासाठी बस पकडली....मुनिरका परिसरातील सीसीटीव्हीमध्ये रात्री नऊ वाजून एक मिनिटांनी ही बस जातानांचं दृश्य कैद झालं आहे..त्यानंतर महिपालपूरा जवळही सीसीटीव्हीत रात्री दहा वाजून ५ मिनिटांनी हे बस दिसून आली..
दिल्ली गँगरेपप्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आलीय. तर दोन जण अद्याप फरार आहेत. रामसिंग, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केलीय. काल चालत्या बसमध्ये एका तरूणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. बसवर लिहलेल्या नावावरून पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आणि आरोपींना पकडण्यात यश आलं. या प्रकरणाच्या सुनावणीची मागणी फास्टट्रॅक कोर्टात करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलय. दुसरीकडे याचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटतायेत. या घटनेनंतर दिल्लीत नागरिकांनी निदर्शनं करून या घटनेचा निषेध...दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. दिल्लीच्या वसंत विहार परिसरातही विद्यार्थ्यांनी निदर्शनं करून या घटनेचा तीव्र निषेध केला.
या घटनेत जखमी झालेल्या तरुण तरुणीला सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आलंय..पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय..तरुणीला कृत्रिम श्वात्सोश्वास दिला जातं आहे.. ज्या बसमध्ये गुन्हा घडला त्या बसचा परवाना रद्द केला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी सांगितलंय..
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा उघड झालं आहे..
गेल्या वर्षभरात दिल्लीत पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिल्ली रेप कॅपिटल झाल्याचं आढळून येईल....पण ही परिस्थिती केवळ राजधानी दिल्लीतच आहे असं नाही तर इतर महानगरांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही..
दिल्लीत महिला असुरक्षित असल्याचं नेहमीच बोललं जातंय..गेल्या काही वर्षातील दिल्लीत घडलेल्या महिलांविषयक गुन्ह्यांवर नजर टाकल्यास दिल्लीत महिला किती सुरक्षित आहेत हे सहज लक्षात येईल...
नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकडेवारीनुसार दिल्ली हे महिलांसाठी असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे..
२०११मध्ये देशात महिलांविषयीचे २,२८,६५० गुन्हे घडले आहेत.. तर २०१०मध्ये देशात महिलांविषयीचे घडलेले गुन्ह्यांचा आकडला २,१३,६८५ इतका होता..महिलांसाठी महानगरं हे असुरक्षित बनत चालली आहेत...दिल्ली ४,४८९ महिलाविषय गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.. महिलांविषयींच्या गुन्ह्यात प. बंगाल सर्वात पुढे आहे. प.बंगालमध्ये पोलीस दप्तरी २९,१३३ गुन्ह्यांची नोंद झालीय.देशात गेल्या पाच वर्षात महिलांविषयीच्या गुन्ह्यात २ % वाढ झालीय.
आंध्रप्रदेशात महिलांच्या लैंगिक शोषणांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत...आंध्रप्रदेशात लैंगिक शोषणांच्या ३६५८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय...महिलांच अपहरण आणि हुंडाबळीच्या घटनांसाठी उत्तरप्रदेश बदनाम आहे. देशातील ५३ मोठ्या शहरात महिलांविषयीच्या ३३,७८९ गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्डमध्ये नमुद करण्यात आलंय. देशात महिला किती असुरक्षित आहेत हे देशात घ़डलेल्या बलात्काराच्या घटनांवरुन सहज लक्षात येईल. देशात २०११मध्ये एकूण २४,२०६ बलात्काराच्या घटना घ़डल्या आहेत...तर २०१०मध्ये बलात्काराच्या २२,१७२ घटनांची नोंद झालीय...महिलांच्या अपहरणाच्या ३५,५६५ घटना तर २०१०मध्ये महिलांच्या अपहरणाच्या २९,७९५ घटना घडल्या आहेत..ही सगळी आकडेवारी पहाता देशात महिलांच्या सुरक्षेची किती बिकट अवस्था आहे हे सहज लक्षात येईल..
First Published: Tuesday, December 18, 2012, 23:40