Last Updated: Wednesday, December 19, 2012, 16:53
www.24taas.com, मुंबईदिल्लीत घडलेला अत्यंत घृणास्पद अशा गँगरेप प्रकरणामुळे सारेच सुन्न झाले आहेत. तरूणीवर करण्यात आलेल्या गँगरेपमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महिलेवर अत्यंत पाशवी बलात्कार केल्याने तरूणीची प्रकृती प्रचंड गंभीर झाली आहे.
त्यामुळे तरूणीबाबत प्रचंड चिंता व्यक्त करण्यात येते आहे. पण या प्रकारामुळे अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांनी याबाबत ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. काय म्हणाले ह्या कोण कोण?
फराह खान - `बलात्कार करणा-या दोषीला नपुंसक करायला हवे. त्यामुळे आपल्या समाजाला चांगला संदेश मिळेल.`
हुमा कुरैशी - ``बलात्कार करणा-याला फाशीची शिक्षा दिल्यामुळे ही समस्या संपणार नाहीये. प्रत्येक दिवशी स्त्रियांचा सन्मान करायला हवा.``
करीना - कायद्यांचा फेरआढावा घेणे गरजेचे आहे. झटपट न्याय मिळवण्यासाठी ते आवश्यक आहे.
अमिताभ बच्चन - `खूप काही म्हणायचे होते. मात्र दिल्लीत घडलेल्या गँगरेपच्या घटनेमुळे मी खूपच डिस्टर्ब झालोय. हा अक्षम्य गुन्हा आहे. आपण स्त्रीची दुर्गा, काली आणि लक्ष्मीच्या रुपात पूजा करतो. आपण स्त्रीचा आदर करायला हवा.`
सलमान खान - अशा घटना ऐकल्यावर मला चीड येते. माझ्यासाठी हा अत्यंत हीन गुन्हा आहे. बलात्कार करणा-या आरोपींना तुरुंगात टाकल्यावर त्यांना मरेपर्यंत मारहाण केली पाहिजे.
First Published: Wednesday, December 19, 2012, 16:12