गँगरेपमधील आरोपींना अटक, तरूणी गंभीर जखमी, Delhi gangrape Girl conscious but critical, nation numbed

गँगरेपमधील आरोपींना अटक, तरूणी गंभीर जखमी

गँगरेपमधील आरोपींना अटक, तरूणी गंभीर जखमी
www.24taas.com, नवी दिल्ली

रविवारी रात्री दिल्लीत सर्वत्र थंडीचा कडाका,शांतता पसरली होती...दिल्लीकर झोपण्याच्या तयारीत होते..त्याचवेळेस एक असहाय्य महिला जिवाच्या आकांतानी ओरडत होती, मदतीची याचना करत होती... २३ वर्षाच्या त्या तरुणीवर काही नराधमांनी पाशवी बलात्कार केला होता. आणि त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला नग्नावस्थेत चालत्या बसमधून खाली फेकलं. तरूणी गंभीर जखमी झाल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर दिल्ली हादरून गेली.. तीन दिवसांनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र अजुनही काही आरोपी फरार आहेत.

सीसीटीव्ही कॅम-यात कैद झालेल्या बसच्या दृश्यांमुळे आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. बसमध्ये त्या असहाय्य महिलेवर मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. दिल्लीतील सगळ्यात दुर्दैवी घटना घडली आहे.. अशी घटना ज्यामुळे दिल्लीकर प्रचंड हादरून गेले आहेत. दिल्लीकरांमध्ये प्रचंड तणाव पसरला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि दिल्लीतील सगळ्यात वर्दळीच्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. मात्र अजूनही पोलीस सगळ्याच आरोपींपर्यंत पोहचू शकलेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी बलात्काराच्या घटनेत सहभागी झाले होते.

पकडण्यात आलेल्या आरेोपींपैकी राम सिंह हा मुख्य आरोपी आहे. राम सिंह हा मुख्य आरोपी असून राम सिंह आर.के.पुरम झोपडपट्टीत राहतो. राम सिंह हा बसचा ड्रायव्हर होता. मात्र घटना घडली तेंव्हा त्याचा भाऊ बस चालवत होता. इतर आरोपींचीही ओळख पटली असून पोलीस त्यांच्या शोघात आहे.

First Published: Tuesday, December 18, 2012, 12:55


comments powered by Disqus