दिल्ली गँगरेप : गुन्ह्याची कबुली, स्वत:साठी मागितली फाशीची शिक्षा, Hang me till death: Gang-rape accused to court

दिल्ली गँगरेप : गुन्ह्याची कबुली, स्वत:साठी मागितली फाशीची शिक्षा

दिल्ली गँगरेप : गुन्ह्याची कबुली, स्वत:साठी मागितली फाशीची शिक्षा
www.24taas.com, नवी दिल्ली

देशाच्या राजधानीत रविवारी चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्राला अमानुषरित्या बसमधून खाली फेकून देणाऱ्या नराधमांविरुद्ध देशात वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी विनय आणि पवन या दोघांनी आपल्या घृणास्पद कृत्याची कबुली दिलीय.

मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं. यातील विनय आणि पवन या दोघा आरोपींनी भरकोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीय. याचसोबत या दोघांनीही आपण केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चाताप असल्याचं म्हटलंय. विनयने तर आपल्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केलीय. पण, या दोघा आरोपींनी ओळखपरेडला मात्र विरोध केलाय.

‘माझा मुलगा लहान आहे. तो निर्दोष आहे. त्याला रात्री मुकेश या तिच्या मित्राने बोलविले होते. त्यानेच माझ्या मुलाला फसविले आहे. जर बलात्कार प्रकणात तो दोषी आढळला तर त्याला तात्काळ फाशी द्या’असं विनयचे वडील हरी राम यांनी म्हटलं होतं.

४० मिनिटांच्या या घटनेनं सगळ्या देशालाच हादरवून सोडलंय. सरकारलाही खडबडून जागं होणं भाग पडलंय. या प्रकरणात आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आलीय. यामध्ये बसचालक राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश, फळ विक्रेता पवन गुप्ता आणि जिम प्रशिक्षक विनय शर्मा यांचा समावेश आहे तर इतर दोन आरोपी अक्षय ठाकूर आणि राजू अजूनही फरार आहेत.

First Published: Wednesday, December 19, 2012, 14:29


comments powered by Disqus