Last Updated: Wednesday, December 19, 2012, 13:38
www.24taas.com, नवी दिल्लीवसंत विहार सामूहिक बलात्कार प्रकरणी जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला फाशीच द्या, अशी मागणी संशयीत आरोपी विनयचे वडील हरी राम यांनी आपली प्रतिक्रिया देताना केली. दरम्यान, पिढीत मुलीची स्थिती अधिक नाजुक आहे.
दोन दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीत एका खासगी बसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंत तिच्या सोबत असलेल्या मित्राला आणि तिला बसमधून खाली फेकून देण्यात आले होते. या घटनेनंतर तक्रार दाखल करूनही बराचवेळ अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे दिल्लीत तीव्र संताप व्यक्त होत होता. तर संसदेतही खासदारांनी या घटनेतील आरोपींना फांशी देण्याची मागणी केली. संसदेतही चिंता व्यक्त करण्यात आलीय.
हरी राम हे विमानतळावर हेल्पर म्हणून काम करतात. तर त्यांचा मुलगा विनय याचे शिक्षण बीकॉमपर्यंत झाले आहे. तो एका जिममध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करीत आहे. माझा मुलगा लहान आहे. तो निर्दोष आहे. त्याला रात्री मुकेश या तिच्या मित्राने बोलविले होते. त्यांनेच माझ्या मुलाला फसविले आहे. जर बलात्कार प्रकणात तो दोषी आढळला तर त्याला तात्काळ फाशी द्या, अशी माहिती हरी राम यांनी दिली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह आणि त्याचा लहान भाऊ मुकेश हेही निर्दोष आहेत, असे कल्लू याच्या आईने म्हटले आहे. पवन, अक्षय ठाकूर आणि राजू हेही संशयीत आरोपी रविदास कॅम्प निवासी संकुल परिसरातच राहत होते.
सामूहिक बलात्कार प्रकणातील संशयीत चारही आरोपींनी अटक करण्यात आली आहे. तर तीन जण फरार आहेत. बस के ड्रायव्हर राम सिंह, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांना दिल्ली अटक केली तर राम सिंह याचा भाऊ मुकेश याला राजस्थानमध्ये अटक केली. विनय हा जिम इंस्ट्रक्टर आहे तर पवन हा फळ विक्रीचा धंदा करतो.
या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि शिक्षण रस्तावर उतरले आहेत. त्यांनी घोषणाबाजी करत आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
First Published: Wednesday, December 19, 2012, 13:38