धोनीला पाठिशी घालणार नाही - दालमियाँ, No cover-up on Dhoni’s conflict of interest: Dalmiya

धोनीला पाठिशी घालणार नाही - दालमियाँ

धोनीला पाठिशी घालणार नाही - दालमियाँ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

चॅम्पियन ट्रॉफीनंतर धोनीचीही होणार चौकशी, अशी ग्वाही बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमियाँ यांनी दिलीय. ते गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत होते.

राज कुंद्रा यांच्या सट्टेबाजी प्रकरणावर भाष्य करताना दालमियाँ यावर कार्यकारी समितीच्या १० जून रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा होईल, असं म्हटलंय. ‘राज कुंद्रा यांच्या सट्टेबाजीतील सहभागाची बातमी ऐकल्यावर आपल्याला धक्का बसला... जर कुंद्रा या प्रकरणात दोषी ठरले आणि कठोर गरज पडली तर कुंद्रा यांच्यावर कारवाई केली जाईल’ असंही दालमियाँ यांनी म्हटलंय.

यानंतर धोनीबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तरं देताना ‘धोनीला वाचवण्याचे प्रयत्न होणार नाहीत अशी ग्वाही दिलीय. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतात परतल्यावर धोनीची आणि धोनीच्या कंपनीचीही होणार चौकशी होईल’ अशी ग्वाही त्यांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 20:34


comments powered by Disqus