आपल्याचं टीमवर लावलेले पैसे हरल्याची कबुली, Thursday, June 06, 2013 Jobs | Sitemap IPL spot-fixing: ‘Raj Kund

आपल्याचं टीमवर लावलेले पैसे हरल्याची कबुली

आपल्याचं टीमवर लावलेले पैसे हरल्याची कबुली
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचाही सट्टेबाजीत सहभाग असल्याचं उघड झालंय. नव्हे तशी कबुलीच राज कुंद्रानं दिल्ली पोलिसांसमोर दिलीय, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी दिलीय.

राज कुंद्रानं आयपीएलच्या मागच्या आणि यंदाच्या सत्रात सट्टेबाजी केल्याचं कबूल केलंय. मित्रांच्या मदतीनं राज कुंद्रा सट्टेबाजी करत असल्याचं समजतंय. राज कुंद्रा आपल्याच टीमवर म्हणजे राजस्थान रॉयल्सवर सट्टा लावत होता. या सट्टेबाजीच्या प्रकारात आपण आपले पैसे गमावल्याचंही कुंद्रा यांनी पोलिसांसमोर कबूल केलंय. त्यामुळे आता राज कुंद्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर राज कुंद्राही आता पोलिसांच्या संशयाच्या फेऱ्यात अडकलाय. कुंद्राचा पासपोर्ट याआधीच जप्त करण्यात आलाय. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीशिवाय देश सोडूणंही त्याला शक्य नाही. राज कुंद्रा याचा मित्र उमेश गोयंका याला सरकारी साक्षीदार बनवण्यात आलंय.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण आणि सट्टेबाजीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरून राजस्थान रॉयल्स टीमचा मालक राज कुंद्रा याची तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आलाय.

याअगोदर मीडियामध्ये आलेल्या बातम्यांमुळे हैरण झालेल्या कुंद्रा पती-पत्नीनं ट्विटरवरून मीडियाला चांगलंच सुनावलंय. ‘मीडिया बातम्या विकण्यासाठी छोटी गोष्ट मोठी करून का समोर आणतात. ज्या सूत्राकडून माहिती मिळालीय तो विश्वास न ठेवण्यासारखं सूत्र आहे. योग्य बातमीसाठी क्राईम ब्रांन्चच्या अधिकाऱ्यांशी बोला’ असा अनाहूत सल्लाही राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीनं मीडियाला दिला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 14:01


comments powered by Disqus