धोनीच्या पत्नीची मैत्रीण श्रीशांतची गर्लफ्रेंड, police used honeytrap in the arrest of sreesanth

धोनीच्या पत्नीची मैत्रीण श्रीशांतची गर्लफ्रेंड

धोनीच्या पत्नीची मैत्रीण श्रीशांतची गर्लफ्रेंड

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आता खेळाडूंच्या गर्लफ्रेंडचे कनेक्शन समोर आले आहे. श्रीशांतने बुकींकडून मिळालेल्या रकमेतून आपली मैत्रिण साक्षी झाला हीला ४२ हजार रूपयांचा ब्लॅकबेरी झेड-१० हा फोन गिफ्ट दिला. बुकीजनंतर पोलिसांनी श्रीशांतलाही हनीट्रॅपमध्ये फसवले होते.

स्पेशल पोलिस कमिशनर (स्पेशल सेल) सच्चिदानंद श्रीवास्तव यांनी सांगितले, की श्रीशांतने स्पॉट फिक्सिंगनंतर बुकींकडून मिळालेल्या रकमेतून आपल्या गर्लफ्रेंडला ब्लॅकबेरीचे लेटेस्ट मॉडेल झेड-१० गिफ्ट केला होता. या फोनची किंमत सध्या बाजारात ४२,४९० रुपये आहे.

हा फोन आता श्रीशांतची गर्लफ्रेंड साक्षीकडे जयपूरला असल्याचे श्रीशांतने पोलिसांना सांगितले. पोलिस श्रीशांतला घेऊन जयपूर घेऊन गेले आणि त्यांनी साक्षी झालाकडून तो फोन जप्त केला. साक्षीने दिलेल्या माहितीनुसार तिला माहित नव्हते की, हा फोन बुकीच्या पैशातून खरेदी करण्यात आला होता. पोलिसांनी साक्षीच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी साक्षीला क्लिन चीट दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीशांतची गर्लफ्रेंड साक्षी झाला ही क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी रावतची मैत्रिण आहे. दोघींनी एकत्र हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. दोन्ही चांगल्या मैत्रिणीही आहे. या दोघांना एकत्र क्रिकेट स्टेडियममध्या पाहिण्यात आले होते.

धोनीच्या पत्नीनेच श्रीशांतशी साक्षी झालाची ओळख करून दिली होती.
एस. श्रीशांतच्या अडचणी संपतांना दिसत नाहीत. 15 मेला मुंबईत झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स मॅचपूर्वी श्रीशांतनं 1.95 लाखांची शॉपिंग केली होती. यामध्ये त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला महागडा मोबाईल फोनही खरेदी करून दिला होता.

श्रीशांत या सगळ्या श़ॉपिंगदरम्यान कॅश पेमेंट केल्याचं समोर आलंय. त्यामुळे फिक्सिंगची रक्कम त्यानं या शॉपिंग दरम्यान वापरल्याची शक्यता आणखी बळावली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013, 15:33


comments powered by Disqus