अय्याश श्रीशांत....., sreesanth`s black side

श्रीशांतची नवी ओळख...अय्याश श्रीशांत.....

श्रीशांतची नवी ओळख...अय्याश श्रीशांत.....
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
केरळ एक्सप्रेस व्हाया स्पॉट फिक्सिंग ते अय्याश श्रीशांत हा आहे क्रिकेटपटू एस. श्रीशांतचा प्रवास...क्रिकेटच्या ग्राऊंडवर आपल्या वेगवान माऱ्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेणाऱ्या या केरळाच्या फास्ट बॉलरला लोक आता अय्याश श्रीशांत म्हणूनच ओळखू लागले आहेत. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याचा हा अय्याशीचा चेहराही साऱ्यांसमोर आला.

`केरळ एक्सप्रेस` नावाने क्रिकेटमध्ये निर्माण केलेली ओळख श्रीशांतनं आपल्या कारनाम्यांमुळे कधी मागे टाकलीय.. त्याला लोक केरला एक्सप्रेस किंवा वादग्रस्त श्रीशांत म्हणून नव्हे फिक्सर श्रीशांत आणि त्याहीपेक्षा `अय्याश श्रीशांत` या नावाने ओळखू लागले आहेत.

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल आणि श्रीशांतच अय्याशीही सा-यांसमोर आल. श्रीशांतला ललनांच चांगलच वेड आहे. ज्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल तेव्हाही त्याच्यासमवेत मुली होत्या...आणि आता दररोज त्याच्या अय्याशीची नव-नवी प्रकरण समोर येत आहेत. एवढच नव्हे तर त्याच्या जप्त करण्यात आलेल्या लॅप टॉपमध्ये अनेक तरुणींची अश्लिल फोटो सापडले आहेत.

विशेष म्हणजे एका कास्टिंग डायरेक्टरने त्याला हे फोटो पाठवले होते. यामध्ये काही अभिनेत्रींचेही फोटो आढळले आहेत. श्रीशांत स्वत: या दोन बुकींसमवेत ललनांना आणण्यासाठी मुंबईतील लोखंडवाला भागात गेल्याचही पोलिसांनी सांगितल. काही महिला श्रीशांतच्या रुममध्ये राहिल्याचही उघड झालय. यापूर्वीही श्रीशांतच नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर जोडल गेलय. हे सार समोर आल्यावर त्याची प्रतिमा आता केवळ एकच राहिलीय...ती म्हणजे `अय्याश श्रीशांत`..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013, 18:37


comments powered by Disqus