Last Updated: Saturday, June 22, 2013, 23:18
भारतीय यंगिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमालच केलीय. आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये धोनीचे युवा योद्धे प्रतीस्पर्धी टीम्सवर भारी पडलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यंगेस्ट टीम असलेला माही ब्रिगेड आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात रविवारी फानल होत आहे. यात कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागलंय.