भूक लागल्यावर किती खायचे?,How much food should

भूक लागल्यावर किती खायचे?

भूक लागल्यावर किती खायचे?
www.24taas.com,मुंबई

आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.

आपण जाऊ तिथे भात, डाळ हे पदार्थ नक्की मिळतात. त्यामुळे त्या आहारात बदल करायची गरज नाही. परदेशात जाता, तेव्हा तेथील शेतात पिकवलेली फळं, भाजीपाला खा. भारतात असताना इथे जे पिकतं ते खावं.

रोज किती खावे, हे आपले आपण ठरवले पाहिजे. रोज वेगवेगळं खा, पण पचवायची ताकद ठेवा. त्याआधी तुमच्या पोटाला विचारले पाहिजे. पोटाचे म्हणणे विचारातच घेऊन कृती करावी. तुम्ही जास्त टीव्ही पाहात असाल आणि खाणं सुरू असेल तर तेव्हा टीव्ही बंद करा. म्हणजे आपण काय जेवलो, किती जेवलो आणि आणखी जेवावे की थांबावे, याचा बरोबर अंदाज येईल. जेवताना टीव्ही बंद ठेवला असेल, तर जेवणावर लक्ष केंद्रीत होईल आणि मग किती खाऊ हा प्रश्न दुसऱ्याला विचारण्याची गरजच भासणार नाही!

जेवताना पाणी प्यावं का?

जेवताना पाणी प्यावं का? असा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो. मात्र, जेवतानाच नव्हे; तर दिवसभरात आपल्याला जितक्या वेळी पाणी प्यावंसं वाटतं, तेव्हा प्यावं. पृथ्वीवर २९ टक्के जमीन ८१ टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे पृथ्वीचे संतुलन राहिले आहे. तीच बाब आपल्याबाबती लागू पडते. तहान मारू नये. शरीराला दिवसभर पाण्याचा पुरवठा होत राहणं आरोग्यासाठीही आवश्यक असतं. भूक मारण्यासाठी पाणी पिऊ नये. ते आरोग्याला चांगले नाही.

राईस इज नाईस

आपल्याला प्रत्येक मोसमात जे पिकतं ते खाल्ले पाहिजे. तेव्हा किती खावेत हे तुम्ही प्रथम तुमच्या पोटाला विचारा! भूक ही रोज बदलणारी गोष्ट आहे. तर आजारात बायपास झाल्यावरही शेंगदाणे जरूर खावेत. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर `सॅच्युरेटेड फॅटस` कमी करा, असं सांगितले जाते.

आपण तेल तूप कमी करतो. पण बायपास सर्जरी झाली की, पेशंटला हॉस्पिटलमधून दोन मारी बिस्किटं दिली जातात. जर मारी बिस्किटं चालू शकतात, तर घरी केलेला, थोडंसं साजूक तूप घातलेला भात का चालत नाही?

मारी बिस्किटांमध्ये प्रिझर्वेटिव्हज, सॅच्युरेटेड फॅट असतानाही ती बिस्किटं चालतात, मग आमचे खिमट किंवा मऊ भात का चालत नाही? भात खाणे वाईट नाही. राईस इज नाईस!

First Published: Tuesday, December 11, 2012, 20:06


comments powered by Disqus