दिल्ली गँगरेप : पीडित मुलीत जगण्याची अद्भूत उर्मी, प्रकृती, Delhi gang-rape: Victim is critical but stable, say doctors

दिल्ली गँगरेप : 'ती'च्यात जगण्याची अद्भूत उर्मी, प्रकृती गंभीर

दिल्ली गँगरेप : 'ती'च्यात जगण्याची अद्भूत उर्मी, प्रकृती गंभीर
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडित २३ वर्षांची मुलगी मृत्यूशी झुंज देतेय. पण, तिच्यात जगण्याची एक अद्भूत उर्मी आहे, असं म्हणणं आहे या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं... दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलमध्ये या मुलीवर उपचार सुरू आहेत.

पीडित मुलीवर पाच वेळा शस्त्रक्रिया करण्यात आलीय. ती अजूनही व्हेंटिलेटरवर आहे पण तिच्याशी परिस्थितीशी झगडण्याची शक्ती आहे. या कठिण प्रसंगातही तिच्यात जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, असं डॉक्टरांनी म्हटलंय. तिच्यात एक जबरदस्त जगण्याची आणि लढण्याची उर्मी आहे, असं हॉस्पीटलच्या सुपरिटेन्डंटचं बी.डी.अथानी यांनी म्हटलंय.

पीडित मुलीच्या शरीरात खोलवर जखमा झाल्यात. गेल्या २४ तासांपासून तिची प्रकृती आणखीन गंभीर झालीय. गंभीर जखम झाल्यानं तिच्या पोटातील आतडी काढण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री एका चालत्या बसमध्ये मेडिकलला शिकणाऱ्या या मुलीवर गँगरेप करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला विवस्त्र रस्त्यावर फेकण्यात आलं होतं.

First Published: Thursday, December 20, 2012, 13:14


comments powered by Disqus