`ती`ची प्रकृती अजूनही चिंताजनक... ऑपरेशननंतर व्हेंटिलेटर gang rape victim is still in critical condition

`ती`ची प्रकृती अजूनही चिंताजनक... ऑपरेशननंतर व्हेंटिलेटरवर

`ती`ची प्रकृती अजूनही चिंताजनक... ऑपरेशननंतर व्हेंटिलेटरवर
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या पीडित मुलीची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. काही वेळापूर्वीच सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांच्या पथकानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तिच्या रक्तातले प्लेटलेट्स 19 हजारापर्यंत खाली आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तिच्यावर आज ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.

दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका खासगी बसमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर रविवारी रात्री सामूहिक बलात्कार (गॅंग रेप) झाल्याची संतापजनक घटना घडली होती.


गँगरेपनंतर संपूर्ण दिल्लीत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही लाखो दिल्लीकरांनी इंडिया गेट आणि रायसीना हिलवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले जातायेत... मात्र गँगरेप नंतर महिलांच्या सुरक्षेवर आंदोलनाचा भडका उडाला आहे. आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्रूधुरांचाही वापर केला जात आहे..

First Published: Sunday, December 23, 2012, 22:40


comments powered by Disqus