Last Updated: Friday, December 21, 2012, 11:16
www.24taas.com, मुंबईदिल्लीतील गँगरेप घटनेमुळे तिहार जेलमधील कैदीही दु:खी झाले आहेत. तेथील आरोपींनी गुरवारी जेल वॉर्डमध्ये फिरत असणाऱ्या दिल्ली गँगरेपमधील आरोपी मुकेशला जबर मारहाण केली. त्यांच्या या धुलाईमुळे आरोपीच्या चेहऱ्यावर, हातावर आणि शरीरावर जखमा झालेल्या आहेत. मारहाण केल्याने त्याला दुसऱ्या सेलमध्ये आता हलविण्यात आलं आहे.
गँगरेप आरोपींबाबत मीडियातून माहिती मिळाल्याने तिहारी मधील इतर आरोपीही चांगलेच खवळले होते. त्यामुळे त्यांना जेव्हा कळले की, गँगरेपमधील आरोपी इथे आहे तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. आणि त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली. सुत्रांच्या मते, त्याच्यावर ब्लेडने देखील हल्ला करण्यात आला.
जेलच्या विश्वात खूनाच्या केसमधील जो आरोपी असतो. त्याचं स्टेटस हे सगळ्यात जास्त असतं. दुसऱ्या श्रेणीत अपहरण करणारे आणि खंडणी मागणारे असतात, तर तिसऱ्या श्रेणीत भुरटे चोर असतात. खतरनाक आरोपींच्या दृष्टीने बलात्काराचे आरोपी हे अत्यंत नीच असतात. बलात्कार केलेल्या आरोपींना इतर आरोपी नोकरासारखे वागवतात. त्यानंतर त्यांना त्यांचे पाय दाबायला लावणे, मालिश करून घेणे. अशी कामं करून घेतात.
जेल अधिकाऱ्यांच्या मते, बहुतेक वेळेस इतर आरोपींपासून बलात्कारी आरोपींना वेगळं ठेवलं जातं. जेव्हा जेव्हा असे आरोपी येतात त्यांना मारहाण केली जाते. आणि असाच प्रकार काल तिहारमध्ये झाला. आणि ह्या प्रकरणात महिलेवर पाशवी बलात्कार केल्याने इतर आरोपींनाही संताप अनावर झाला आणि त्यांनी मारहाण केली.
First Published: Friday, December 21, 2012, 11:07