स्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद, युवा खेळाडूंना धमक्या? , ipl cricket fixing, David Young players threatened

स्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद, युवा खेळाडूंना धमक्या?

स्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद, युवा खेळाडूंना धमक्या?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

स्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद कंपनीचा सहभाग असल्याची शक्यता आता आणखी बळावलीय. युवा खेळाडूंना सट्टेबाज दाऊदच्या नावानं धमकावत असल्याचा खुलासा एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय.

दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या आधारे हा खुलासा करण्यात आलाय. युवा खेळाडूंना अंडरवर्ल्डनं विशेष लक्ष्य केलं होतं. त्यांना शिवीगाळ करणे तसंच दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांच्या नावानं धमकावणे असे प्रकार सट्टेबाज करत असंत अशी माहितीही या वृत्तपत्रानं दिलीय.


स्पॉट फिक्सिंग प्रकरणातला सुत्रधार हा परदेशात आहे, असा दावा दिल्लीचे पोलीस कमिशनर नीरजकुमार यांनी यापुर्वीच केला होता. हा परदेशातला सुत्रधार म्हणजे दाऊद इब्राहिमचं असल्याची शक्यता आता बळावलीय.

जगभरात होत असलेल्या सट्टेबाजीचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. दाऊद आणि फिक्सिंग यांचं मागच्या तीन दशकांपासून कनेक्शन आहे. क्रिकेटमधल्या डी कंपनीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झालाय आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नवी दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता स्पॉट फिक्सिंग आणि अंडरवर्ल्डचे संबंध असल्याचं उघड होतं आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चंद्रेश या बुकीचे दुबाईमध्ये असलेल्या सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबई या बुकीशी संबंध असल्याचं तापासात उघड झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 19, 2013, 10:31


comments powered by Disqus