बुकींचा डाव होता अश्लील व्हिडिओचा, अभिनेत्रींचा वापर,Bollywood actresses porn videos using booki`s to try it.

फिक्सिंगसाठी अश्लील व्हिडिओचा डाव, अभिनेत्रींचा वापर

फिक्सिंगसाठी अश्लील व्हिडिओचा डाव, अभिनेत्रींचा वापर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा तिढा दिवसेंदिवस वाढतच आहे. फिक्सिंच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुली पुरविल्या जात होत्या. त्याचबरोबर या मुलींच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्याच्या हालचाली बुकींच्या सुरू होत्या हे आता पुढे येत आहे.

बुकी फिक्सिंगसाठी खेळाडूंना मुली पुरवत होते. ते एवढ्यावरच न थांबता त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करण्याचाही त्यांचा डाव होता. यातून खेळाडूंना ब्लॅकमेल करण्याची त्यांची खेळी होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडलाय. एस. श्रीसंत, अजित चंदेलिया आणि मुंबईचा अंकीत चव्हाण यांना अटक करण्यात आल्यानंतर अनेक बाबी चौकशीत पुढे आल्या आहेत. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी आधी सात बुकींना त्यानंतर आणखी काही बुकींना अटक केल्यानंतर आयपीएल फिक्सिंगचे धागेदोरे दुबई पर्यंत असल्याचे पुढे आले. शिवाय या फिक्सिंगमध्ये दोन अभिनेत्री सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या मराठी अभिनेत्री असल्याचे सांगितले जात आहे.

बुकी चंद्रेश पटेल आणि मनन यांनी वर्षाच्या प्रारंभीच राजस्थानचा खेळाडू श्रीसंत आणि अजित चंदेलिला यांना अनेकवेला मुली पुरवल्या होत्या. सट्टेबाजांच्या जप्त लॅपटॉपची तपासणी सुरू आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि अहमदाबादला पोलीस पथके पाठवलीत. याशिवाय अजित चंदेलिया याच्या फरिदाबादेतील घरावर छापाही टाकण्यात आला आहे. यातून अधिक माहिती हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फिक्सिंगचे चित्रपटसृष्टीशी कनेक्शनही समोर आले आहे. सामन्याच्या आधी खेळाडूंनी दोन तास दोन अभिनेत्रींशी चर्चा केली होती. यातील एक अभिनेत्री मराठी आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली असून, त्यांनी अद्याप कोणाही अभिनेत्रीचे नाव सांगितलेले नाही. मात्र, चंदेरीदुनियेतीली `क्रांती`कारक पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी श्रीसंत, चंदेलिया आणि अंकित चव्हाण या खेळाडूंची शनिवारी पुन्हा चौकशी केली. या वेळी तिघे समोरासमोर होते. याआधी या तिघांची स्वतंत्र चौकशी झाली. दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव चौकशी फिक्सिंग प्रकरणाचा तपास करीत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 19, 2013, 08:57


comments powered by Disqus