नरेंद्र मोदी गुजरातमधून निवडणूक लढवणार modi contest loksabha from gujrat

नरेंद्र मोदी गुजरातमधून निवडणूक लढवणार

नरेंद्र मोदी गुजरातमधून निवडणूक लढवणार
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे गुजरातमधून निवडणूक लढवणार आहेत.

मात्र उत्तर प्रदेशातील दुसऱ्या जागेवरूनही नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता कायम आहे.

प्रदेश भाजपा महासचिव विजय रूपानी यांनी ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी हे निश्चित गुजरातमधून निवडणूक लढवतील.

यात राज्यातील अहमदाबाद, राजकोट किंवा सुरतमधूनही मोदी निवडणूक लढवू शकतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा गुजरातमधून लढवावी, अशी इच्छा भाजपा कार्यकर्त्यांची आहे, म्हणून मोदी गुजरातमधून निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय.

मात्र या बरोबर भारतातून आणखी एका ठिकाणी नरेंद्र मोदी निवडणूक लढवण्याची शक्यता कायम आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 19:07


comments powered by Disqus