Last Updated: Friday, June 21, 2013, 22:45
www.24taas.com, झी मीडिया,डेहराडूनउत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना नेपाळी गुंडांकडून हतबल भाविकांवर अत्याचार करण्यात येत असून मौल्यवान दागिन्यांची लूटही करण्यात आलेय.
पुराच्या संकटात अडकलेल्या आणि आपत्तीग्रस्त उत्तराखंडमधील परिस्थितीचा गैरफायदा घेत काही नेपाळी गुंडांनी विघातक कृत्ये केल्याचे समोर आले आहे. या गुंडांनी केदारनाथजवळ अडकून पडलेल्यात भाविकांवर हल्ले करून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू, पैसे लुटले, तसेच शिवाय महिलांवर अत्याचारही केले. तर गुंडांनी बँकांचे लॉकर्सही फोडण्याप्रयत्न केला.
उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मदत मिळत नाही. तसेच अन्न-पाण्यावाचून दिवस काढावे लागत असल्याने आम्हाला वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका आणि उडवून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया एका भाविकांने व्यक्त केलेय.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील एका स्थानिक वृत्तपत्राने लुटीचे आणि अत्याचाराचे प्रकार उजेडात आणले आहेत. लूड करण्याच्या प्रकाराबाबत पीडित लोकांनी ही माहिती दिली. येथील हतबल भाविकांची बिकट अवस्था आहे. संकटात सापडलेल्या भाविकांना नेपाळी गुंडाने टार्गेट केलंय. केदारनाथजवळील जंगल परिसरात ५० नेपाळी गुंडांनी भाविकांवर सशस्त्र हल्ला करुन मारहाण केली.
या गुंडानी केवळ मारहाण केली नाही तर महिला भाविकांकडून सामान, दागिने, मौल्य्वान वस्तून लुटल्या. तर काही महिलांना ते जंगलात नेऊन त्यांच्यावर बलात्कायर केले. त्या.पैकी काही महिला अद्याप बेपत्ता आहेत. गुंडांच्या दहशतीमुळे भाविकांमध्ये. प्रचंड घबराट पसरली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, June 21, 2013, 22:45