मृत्यूपूर्वी काय सांगितलं सुनंदा पुष्कर यांनी नलिनी सिंग यांना?What did Sunanda Pushkar tell Nalini

मृत्यूपूर्वी काय सांगितलं सुनंदा पुष्कर यांनी नलिनी सिंग यांना?

मृत्यूपूर्वी काय सांगितलं सुनंदा पुष्कर यांनी नलिनी सिंग यांना?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू पूर्वी त्यांनी पत्रकार आणि सुनंदा यांची मैत्रिण असलेल्या नलिनी सिंग यांना फोन केला असल्याचं स्पष्ट झालंय. नलिनी सिंग यांनी याबाबत माहिती दिलीय.

१६ आणि १७ जानेवारीला सुनंदा पुष्कर खूप डिस्टर्ब होत्या. झी मीडियासोबत बोलतांना नलिनी सिंग यांनी माहिती देतांना सांगितलं, की सुनंदा पुष्कर यांचा आवाज खूप नैराश्यजनक येत होता. त्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि आपल्या नवऱ्याच्या संबंधांवरुन खूपच निराश झाल्या होत्या.

१७ जानेवारीला दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नलिनी सिंग यांचं सुनंदा पुष्करसोबत अखेरचं फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यानंतर बीबीएम आणि मेलवरुनही त्या मेहर तरार आणि शशी थरुरबद्दल बोलत होत्या.

नलिनी म्हणाल्या, त्यांच्यात आणि सुनंदा पुष्करमध्ये झालेलं संभाषण त्यांनी पोलिसांनाही सांगितलंय. १७ जानेवारीला या लव्ह ट्रॅंगलवरुन झालेल्या ट्विटर संभाषणांनंतर नवी दिल्लीतल्या हॉटेल लीलामध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला.
हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. सुनंदा यांच्या शरीरावर जखमा असल्याचंही सांगण्यात आलंय. त्यामुळं त्यांच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलंय.


पाहा व्हिडिओ




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 19, 2014, 10:29


comments powered by Disqus