सुनंदा मृत्यू : पंचतारांकित हॉटेलमधून CBIने मोबाईल घेतला ताब्यात, sunanda pushkar found dead

सुनंदा मृत्यू : पंचतारांकित हॉटेलमधून CBIने मोबाईल घेतला ताब्यात

सुनंदा मृत्यू : पंचतारांकित हॉटेलमधून CBIने मोबाईल घेतला ताब्यात
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सुनंदा पुष्कर यांचा गुढ मृत्यू हायप्रोफाईल केस असल्यामुळे CBIच्या फॉरेन्सिक टीम ने लीला हॉटेलमधील सुनंदा राहत असलेल्या खोलीची पाहाणी करून पुरावे गोळा केलेत. सुनंदा यांच्या मोबाईल CBIने ताब्यात घेतला आहे. दरम्यान, पती केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल कण्यात आलं होतं.

शशी थरूर यांना एम्स हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. थरूर यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचाराकरता एम्समध्ये दाखल केलं. आता त्यांना आयसीयूतून बाहेर काढण्यात आलं आहे. शुक्रवारी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दिल्लीतल्या लीला हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला.

आपल्या घराचे रंगकाम सुरू असल्याने गुरुवारी त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. शशी थरुर यांनीच सुनंदांच्या मृत्यूची बातमी पोलिसांना कळवली. याप्रकरणी आता हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातंय. त्याचबरोबर फॉरेन्सिक एक्सपर्टसचीही मदत घेतली जातेय. मात्र सुनंदा पुष्कार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे रहस्य पोस्टमार्टमनंतर पुढे येणार असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुनंदा पुष्कार यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केलंय. पंतप्रधान यांनी शशी थरूर यांच्यासोबत फोनवर संवाद साधून दु:ख व्यक्त केलंय. तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सुनंदा यांच्या मृत्यूमुळे दु:ख झाल्याचं म्हटलंय.

काय होता पत्नीचा आरोप
केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्यावर त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनी गुरुवारी गंभीर आरोप केले होते. थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी असलेल्या कथित प्रेम संबंधांमुळे सुनंदा पुष्कर त्यांच्यावर प्रचंड नाराज होत्या. एवढंच नव्हे तर त्यांनी थरूर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यांच्या वतीनं मेहर तरार यांना काही ट्विट मेसेजही पाठवले होते.. या दोघींमध्ये ट्विट युद्धही गाजलं.

सुनंदा हे काय केलंस
पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांनी सुध्दा सुनंदा यांच्या गुढ मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलंय. मेहर यांनी ट्विट करून सुनंदा यांच्या मृत्यूची बातमी एकून दु:ख झाल्याच म्हटलंय. सुनंदा हे काय केलंस. तसेच आपला मुलगा सुद्धा ही बातमी ऐकूण रडत असल्याचं त्यांनी ट्विट केलंय. मागील काही दिवसात मेहर आणि सुनंदा यांच्यात ट्विट युध्द रंगलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 18, 2014, 11:07


comments powered by Disqus