Last Updated: Saturday, January 18, 2014, 09:51
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचे दिल्लीतील लीला या पंचतारांकीत हॉटेलमध्ये गुढ मृत्यू झाला. मात्र, त्याआधी सुनंदा यांनी अखेरच ट्विट केला होता, मी हसत जाणार. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत अधिकच गुढ वाढलंय.
जे व्हायचे आहे, ते होणारच आहे. हसत जाणार, असा शेवटचा ट्विट सुनंदा यांनी पहाटे ५:२७ वाजता केला. त्यानंतर तीन मिनिटांनी मित्राला एक ट्विट केला. प्रयत्न करीन, सर्व तपासण्या झाल्या आहेत. आता कुणाला माहीत आहे. हसत जाणार. त्यामुळे तिला नेमके काय सुचवायचे होते याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
शशी थरुर यांचे एका पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं जाहीर करणाऱ्या सुनंदा पुष्कर यांचा शुक्रवारी गुढरित्या मृत्यू झालाय. दिल्लीतील लीला हॉटेलमधल्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला आहे. थरुर यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोन दिवसांपासून सुनंदा नाराज होत्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. LIVE : व्हिडिओ पाहा
First Published: Saturday, January 18, 2014, 09:51