Last Updated: Monday, May 27, 2013, 22:14
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनजगभरात लैंगिक शोषण करणाऱ्यांबद्दल समाजात घृणा असते. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, असा आग्रह अनेक जणांनी धरला आहे. अशा परिस्थितीत लीडिया गुथ्रे नामक एक सामाजिक कार्यकर्ती अशा गुन्हेगारांसोबत राहून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
यासंदर्भात लिडिया गुथ्रे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, की सर्व प्रथम मी जेव्हा एका मुलाचं लैंगिक शोषण करणाऱ्या गुम्हेगाराला भेटले, तेव्हा मी प्रचंड घाबरले होते. मात्र तो अत्यंत सामान्य माणूस होता. त्याच्यामध्ये असणाऱअया विकृतींमुळे तो लैंगिक शोषण करत असे. त्यामुळे त्याच्यातील विकृती नष्ट करण्याची जबाबदारी मी स्वीकारली. लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना शोषणानंतर अपराधी वाटू लागतं. त्यांच्यातील नकारात्मक भावना काढण्याचा गुथ्रे प्रयत्न करतात. त्यांना वाळीत टाकल्यावर ते अधिक विकृत बनू शकतात. त्यामुळे त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी गुथ्रे त्यांना मगदत करतात.
गेली १५ वर्ष लुथ्रे अशा गुन्हेगारांसोबत काम करत आहेत, ज्यांनी बलात्कारांहूनही लज्जास्पद गुन्हे केले आहे. गुथ्रे अशा गुन्हेगारांसाठी मानसोपचारत्ज्ज्ञ म्हणून काम करतात. अनेकदा या गुन्हेगारांचा राग येतो, पण राग व्यक्त करण्यापेक्षा अशा गुन्हेगारांना गुन्ह्यांपासून पराव्त्त करण्याचं समाधान जास्त आहे असं गुथ्रे यांना वाटतं. दरवर्षी सरासरी १८.५% गुन्हेगारांच्या मानसिकतेत त्यांना बदल घडलेला दिसला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, May 27, 2013, 16:35