अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड Arundhati RAi Comaint On Mahatma Gandhi

अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड

अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.

अरुंधती रॉय यांच्या विधानाचा समाचार घेताना, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, `अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली असून, अशा विधानाने गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचाही अपमान केलायं. गांधीजी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा तत्वानुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांचा आदर्श ठेवून नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग यांनी वर्णद्वेषाविरुद्ध लढा दिला आणि शांततेने न्याय मिळवला, अशा गांधीजीबद्दलचा अभ्यास अरुंधती रॉय यांचा अपुरा आहे.

गांधीनी अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. मात्र रॉय स्वत:ला गांधीजींपेक्षा श्रेष्ठ आणि ज्ञानी समजत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी रॉय असे विधान करत असल्याचा आरोप ही आव्हाड यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 21:00


comments powered by Disqus