Last Updated: Wednesday, January 30, 2013, 17:20
www.24taas.com, मुंबईउद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी आता भाजपही सरसावले आहे. शिवसेना-मनसेचे एकत्रिकरण व्हावे ही भाजपचीच इच्छा असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं आहे. `मला वाटतं की उद्धव ठाकरे यांन त्यांचं मन स्पष्ट केलं आहे. आणि त्यांनी त्याचं पुढचं पाऊल पुढं टाकलं आहे, ते म्हणजे मनसे-शिवसेना एकत्र यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.`
`माझी याला तयारी आहे अशीच उद्धव ठाकरे यांची भुमिका घेतली आहे. जिथपर्यंत भाजपची भुमिका आहे. ती म्हणजे हे दोघं एकत्र आले तर भाजपला नक्कीच आनंद होईल.` त्यामुळे भाजप राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याकडे फारच सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. कारण की राज ठाकरे यांनी महायुतीत प्रवेश केल्यास त्याच्या नक्कीच फायदा होईल असे भाजपला वाटते.
गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केल्याने भाजप त्यांच्या या एकत्रिकरणासाठी अनुकूल आहे. मात्र त्या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी भाजप किंवा मुंडें स्वत: काही प्रयत्न करणार का? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
First Published: Wednesday, January 30, 2013, 14:19