राज ठाकरे महायुतीत येण्यास आठवलेंचा विरोध, Ramdas Athawale oppose to Raj Thackeray

राज ठाकरे महायुतीत येण्यास आठवलेंचा विरोध

राज ठाकरे महायुतीत येण्यास आठवलेंचा विरोध
www.24taas.com, मुंबई

`राज ठाकरे महायुतीसोबत आणि काँग्रेस आघा़डीसोबत नसल्यामुळे असा एक मतदार वर्ग आहे जो, तो मतदार दोघांनाही कव्हर करत नाही. अशा पद्धतीची मतं राज यांना मिळालेली आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे आमच्यासोबत आल्याने आम्हाला तेवढी मतं मिळतील असे वाटत नाही.

`असा जर काही प्रयोग झालाच तर, म्हणजे राज ठाकरे यांनी महायुतीत येण्याचा प्रस्ताव मांडला तर, त्याविषयी आरपीआयला गंभीर होऊन विचार करावा लागेल, आणि मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून काय ते ठरवावं लागेल. असं म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज-उद्धव एकत्र येण्याबाबत आरपीआयने मात्र वेगळीच भुमिका घेतली आहे.`

आरपीयचे नेते रामदास आठवले यांना राज-उद्धव यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ नये असे वाटते आणि त्यामुळेच त्यांना ही युती नामंजूर असून त्यांनी राज ठाकरेंना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणाबाबत संपूर्ण राज्यात अनेक चर्चा सुरू आहेत.

अनेकांनी राज-उद्धव एकत्र यावेत असाच सूर लावला आहे. राज-उद्धव हे एकत्र आल्यास भाजपला आनंदच होईल असं म्हटले आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या आरपीआयने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

First Published: Wednesday, January 30, 2013, 14:54


comments powered by Disqus