Last Updated: Wednesday, January 30, 2013, 22:11
www.24taas.com, मुंबईशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांच लक्ष होतं. मात्र, राज ठाकरे यांनी भाषणात त्यासंदर्भात उत्तर देण्यास टाळलं.
राज ठाकरे काय प्रतिसाद देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. विविध वृत्तवाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचेही पत्रकार राज ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उपस्थित होते. मात्र आपल्या भाषणात सुरुवातीलाच आपण या विषयावर बोलणार नसल्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले. आज दादूंचा (उद्धव) दिवस नाही दादांचा (मधुकर सरपोतदार) दिवस आहे, असं आपल्या मिश्किल शैलीत राज ठाकरे म्हणाले. `त्या` विषयावर मी योग्य वेळी बोलेन, असं म्हणत राज ठाकरेंनी सर्व चर्चांना विराम दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत मनसे-शिवसेना एकत्र येण्याबाबत संकेत दिले आहेत. मात्र आता ह्या गोष्टीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिसाद याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव-राज यांच्या एकत्र येण्याबद्दल अनेक तर्क-वितर्क सुरू असतानाच राज ठाकरेंनी मात्र योग्य वेळेची वाट पाहाण्याचं ठरवलं आहे.
First Published: Wednesday, January 30, 2013, 21:34