मुंबईतील गुन्हेगारी बाहेरून आलेल्या लोकांमुळे - शिवसेना, mumbai crime, because outside of the people - Shiv Sena

मुंबईतील गुन्हेगारी बाहेरून आलेल्या लोकांमुळे - शिवसेना

मुंबईतील गुन्हेगारी बाहेरून आलेल्या लोकांमुळे - शिवसेना
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

मुंबईत जी बलात्काराची घटना झाली आहे ती बाहेरून आलेल्या लोकांमुळे, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा या निमित्ताने पुढे आला आहे. गॅंगरेप प्रकरणी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच मुंबईत गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. कालच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री आर. आर. पाटलां यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अशा घटना या बाहेरुन आलेल्या लोकांमुळेच घडत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेचा तीव्र निषेध शिवसेनेने केला आहे. मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणी शिवसेनेतर्फे घटनेचा निषेध करण्यासाठी निषेध मोर्चा काढला. ना.म.जोशी. मार्ग ठाण्यावर शिवसेनेनं हा मोर्चा काढला आहे. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्यात. आर आर पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 23, 2013, 13:09


comments powered by Disqus