Last Updated: Friday, August 23, 2013, 15:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहालक्ष्मी परिसरात एका इंटर्न महिला फोटो पत्रकारावर पाच जणांना सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी २० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पाच जणांचे पोलिसांनी स्केच जारी केले आहे.
मुंबईमधील लोअर परळ भागात २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना रात्री घडली आहे. लोअर परळ येथील शक्तीमील कम्पाऊंड येथे या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही तरुणी एका मॅगझिनसाठी न्यूज फोटोग्राफर म्हणून काम करते. ती आपल्या सहकाऱ्याबरोबर गेली होती. मात्र, आरोपींनी त्याला बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडित तरुणीला जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या तरुणीचा जबाब नोंदवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र तरुणी अद्याप जबाब देण्याच्या अवस्थेत नाही. या प्रकरणी सध्या २० संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना या आरोपींनी त्यांची मग्रुरी मीडिया समोरही सुरूच ठेवली. मीडियाच्या प्रतिनिधींसमोर हे संशयित आरोपी अश्लील हावभाव करत होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 23, 2013, 10:35