दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव - Marathi News 24taas.com

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

www.24taas.com, मुंबई
 
दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.
 
इच्छाशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमताच आपल्याकडे नाही, असं पतंगरावांचं म्हणणंय. दुष्काळात जनता होरपळतेय. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी मंत्री एकमेकांवर आरोप करण्यातच मग्न आहेत, त्यामुळे जनतेला दिलासा देणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.
 
सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच शरद पवारांनी थेट  मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. मुंबईकडे राज्य सरकारचं लक्ष नाही, MMRDA निधी उभारण्यासाठी भूखंड विकतंय, पण त्याचा अतिरेक करु नका, असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांवरच  रोख ठेवत टीका केलीय. इतकंच नाही तर सगळ्यांना बरोबर घेऊन कसं चालायचं असतं, ते जरा त्यांना सांगा, असा निरोपही त्यांनी पतंगरावांमार्फत दिला आहे.

First Published: Saturday, May 5, 2012, 21:18


comments powered by Disqus