गाडी पाण्यात गेली वाहून... पाच मृत्यू - Marathi News 24taas.com

गाडी पाण्यात गेली वाहून... पाच मृत्यू

www.24taas.com, बार्शी
 
ओढ्याच्या पाण्यात क्वालिस गाडी वाहून गेल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. यामध्ये सात जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर तिघेजण सुखरुप बचावले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन जुळ्या लहान मुलींचा समावेश आहे.
 
मुसळधार पाऊस सुरु असताना बार्शी सोलापूर रस्त्यावरील सौंदरे गावात ही घटना घडली आहे. पावसामुळं गावातील सर्व ओढे तुंडूंब भरुन वाहतात. बार्शीच्या शांतीलाल गांधी या व्यापाऱ्याच्या ड्रायव्हरने भरलेल्या ओढ्यातून क्वालिस गाडी नेण्याचा प्रयत्न केला. प
 
रंतू पाण्याच्या दाबानं गाडी ओढ्यात पलटी होऊन सात जण मृत पावले. पाच जणांचे मृतदेह सापडले असून दोन लहान मुली अद्याप बेपत्ता आहेत. तिघाजणांनी गाडीतून उडी मारल्यानं ते बचावलेत. यात ड्रायव्हरचा समावेश असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.
 
 
 

First Published: Wednesday, July 4, 2012, 07:19


comments powered by Disqus