Last Updated: Saturday, November 16, 2013, 14:01
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईतिसऱ्या दिवशी पहिली विकेट ख्रिस गेलची विकेट पडली त्याचवेळी वेस्ट इंडिजचा पराभव दिसून आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी कमाल करीत विंडिजला धक्क्यावर धक्के दिले. शेवटची विकेट सामीने काढली आणि सचिन तेंडुलकरने हातात स्टंप घेऊन दोन्ही हात उंच पसरवून वानखेडेवरील त्याच्या चाहत्यांना सामोरा गेला खरा. पण सचिनच्या डोळ्यात अश्रु दाटलेच. त्यामुळे स्टेडियमवर सन्नाटा पसरला.
सचिनची शेवटची २०० वी कसोटी. या कसोटीनंतर सचिन क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही. त्यामुळे नसा नसात क्रिकेट भिनलेल्या सचिनला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. चाहत्यांचा पाठिंबा पाहून सचिनही भारावून गेला. टीम इंडिया डावाने जिंकली तरीही साधा जल्लोष पाहायला मिळाला नाही. प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य, सचिनचा खेळ संपला. आता क्रिकेट कशाला पाहायचे. स्टेडियमवर अनेकांच्या डोळ्यात अश्रु दिसून आले. चाहत्यांना सचिन क्रिकेटपासून दूर झालेला मान्य नाही.
सचिन चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. माझा सलाम सचिनला, मैदानावर त्याने भल्याभल्यांना रडवलं, आज त्याच मैदानावरून जाताना सचिनला अश्रू आवरले नाही. कभी अलविदा ना कहना, मिस यू सचिन.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 16, 2013, 12:08