आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम, toll audit in Kolhapur

आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम

आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापूरतील आयआरबीच्या टोलविरोधात रान उठलं असताना राज्य सरकारनं अखेर त्याची दखल घेतलीय. आयआरबी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांचं फेरमुल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं. 

काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या राजीनामा अस्त्रामुळे आता राज्य सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. यापूर्वी टोलविरोधात महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आज जिल्हा परिषदेच्याही सदस्यांनी पक्षाच्या जिल्हाक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. त्यानंतर आता मंत्र्यांनीही राजीनामास्त्र उगारलं आहे.

दरम्यान, आयआरबीच्या टोलवसुलीला विरोध आणि पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध म्हणून आज कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद पाळला आहे. त्यामुळं रस्ते, बाजार आणि शाळा-कॉलेजात शुकशुकाट पाहायला मिळाला.

कोल्हापुरात टोल विरोधातील संताप तीव्र झालाय. शहरात बंद पुकारण्यात आलाय. अनेक संघटना, राजकीय पक्ष आंदोलन करतायेत. टोलला सगळ्याच स्तरातून तीव्र विरोध होतोय. हिंदू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी चक्क रंकाळा तलावाच्या पाण्यात उतरुन आंदोलन केलंय.

दुसरीकडे महायुतीनंही टोलविरोधात आंदोलनं सुरू केलंय. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. तर IRB कंपनीचा निषेध आणि कोल्हापूर पोलिसांनी नगरसेवकांसह, महापौर यांच्यावर केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध नोदवण्यासाठी महानगरपालिकेचे साडेपाच हजार कर्मचारी रस्त्यावर उतरलेत. त्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलंय. या तीव्र आंदोलनाची सरकार कशी दखल घेतेय, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ


First Published: Thursday, February 6, 2014, 22:05


comments powered by Disqus