फॉर्म्युला वन कार्स रेस
भारतात पुन्हा एकदा एफ वन रेसची धूम होणार आहे. फॉर्म्युला वन कार्स रेसच्या धमाक्यामध्ये बुद्ध इंटरनॅशनल सर्किट रंगणार आहे. आज नोएडामधील जेपी ग्रुपच्या रेस ट्रॅकवर क्वालिफाइंग रेस झाली, यानंतर रविवारी इंडियन ग्रांपीवर फायनल रेस ही रेसर्स आणि प्रेक्षकांमध्ये उधाण आणणार आहे.
दणक्यात चालू आहे तयारी
भारतात दुसऱ्यांदा ‘फॉर्म्युला वन इंडियन ग्रॅन्ड प्रिक्स’ रेस दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नवी दिल्लीजवळी असलेले ‘बुध्द इंटरनॅशनल सर्किट’ जगभरातील वेगाशी स्पर्धा करणाऱ्या कार्सचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.
दर्शकांची उडेल झुंबड
‘बुध्द इंटरनॅशनल सर्किट’ येथे गेल्या वर्षी जर्मन आर्किटेक आणि रेसट्रॅक डिजाइनर हर्मन टिल्के याने सर्वोत्तम असा रेस ट्रॅक बनवला होता. या वर्षी सुमारे १ लाख प्रेक्षकांना या थराराचा अनुभव घेता येणार आहे.
बुध्द इंटरनॅशनलचा बदलेला नवा लूक
गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर २०११ रोजी स्पोटर्स कारचा शो करण्यात आला होता. पण गेल्या वर्षीपेक्षाही उत्कृष्ट कार्यक्रम करण्यासाठी ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’च्या रेसिंग ट्रॅकमध्ये तांत्रिक दृष्टया बदल करण्यात आले आहेत. कारनं कॉर्नरवर ओवरटेक केल्यानंतर ट्रॅकच्या बाहेरच्या बाजूस गवत लावण्याचा प्रयोग करण्यात आलायं. म्हणजे कार ट्रॅकच्या बाहेर जरी गेली तरी गवतामुळे ट्रॅकवर माती घेऊन येणार नाही,याची काळजी घेण्यात आलीय. टर्न क्रमांक ६, ७ आणि ८ मध्येही कॉर्नरवर काही बदल करण्यात आले आहेत.
देशाने नजर रोखलीय ‘सहारा फोर्स वन’वर
सहारा फोर्स वन ही भारताची एकुलती एक फॉर्म्युला वन रेसिंग टीम आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही देशाचे लक्ष या टीमवर लागून राहिले आहे. या टीमचे मालक विजय माल्या आणि सहारा इंडिया आहेत. या टीममध्ये अमेरिकन रेसर पॉल डी रेस्टा आणि निको हॅल्मेकबर्ग हे आहेत.
भारताचा एकमेव खेळाडू
यावर्षीही बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारताचा एकमेव रेसर नारायण कार्तिकेयन पुन्हा एकदा कार्सच्या रणसंग्रामात दिसणार आहे. नारायण कार्तिकेयन हेस्पेनिया रेसिंग टीमचा रेसर आहे. नेहमी टॉप २०च्या बाहेर असणारा नारायण मागच्या रेसमध्ये १५व्या क्रमांकावर होता. कार्तिकेयन कडून देशाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत.
इंडियन ट्रॅकवर शुमाकरची शेवटची झलक
फॉर्म्युला वन रेसचे कॅप्टन तसेच लागोपाठ सातव्यांदा विजयी ठरलेले विश्व विजयी मर्सिडीज बेंजचे रेसर मायकल शुमाकरची ही रेस शेवटची असणार आहे. हल्लीच शुमाकरने या सिझनमधील ब्राझिलीयन ग्राउंड प्रिक्सपासून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. प्रेक्षक वर्गाला उत्कृष्ट रेसर शुमाकरची रेसिंग ट्रॅकवर शेवटची झलक पाहायला मिळणार आहे.
अलांजोवरील विश्वास
फर्नांडो अलांजो फेरारीचा प्रभावी रेसर. प्रबळ आत्मविश्वास असलेल्या या खेळाडूकडून दर्शकांच्या फार अपेक्षा आहेत कारण अलांजो मागील रेसमध्ये विजेता ठरलेल्या सबेस्टियन विटेलहून फक्त ६ मार्कांनी मागे होता.
पुन्हा एकदा इतिहास रचण्यास सबेस्टियन सज्ज
गेल्या वर्षी भारतात झालेल्या फॉर्म्युला वन रेसमध्ये रेड बुलचा रेसर सबेस्टियन व्हेटलनं इंडियन ग्राउंड प्रिक्सची रेस जिंकली होती. आतापर्यत व्हेटलच क्रमांक एकवर आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सबेस्टियन पुन्हा एकदा बाजी मारण्यास उत्सुक आहेत.
/marathi/slideshow/भारतात-एफ-१-रेसची-धूम-२_159.html/17