Last Updated: Wednesday, November 23, 2011, 10:41
कल्याण गायन समाजाला देखील दीर्घ परंपरेचा भरजरी वारसा लाभला आहे. गायन समाज दरवर्षी देवगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करतं. यंदा देवगंधर्व संगीत महोत्सवाची दशक पूर्ती साजरी करण्यात येणार आहे. देशभरातील शास्त्रिय संगीतातील दिग्गजांचे सुश्राव्य गायन, वादनाच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन कल्याण गायन समाज दरवर्षी करतं.