इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

Last Updated: Sunday, June 22, 2014, 19:53

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.

बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली, एअरपोर्टवरून बेपत्ता

Last Updated: Monday, May 19, 2014, 17:08

बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आलेली एक महिला एअरपोर्टवरून अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार घडलाय. नवी दिल्लीच्या गीता कॉलनीत राहणारी एक महिला ही महिला आहे. ही घटना 13 मेची आहे. गीता कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आलीय. मुंबईत याप्रकरणी तपास सुरू झालाय.

मुंबईत समुद्रावर एअरपोर्ट बनवण्याचा विचार

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 20:47

महाराष्ट्र सरकारचा नवी मुंबई एअरपोर्टच्या बदल्यात समुद्रात एअरपोर्ट बनवण्याचा विचार सुरू आहे. नवी मुंबई एअरपोर्टसाठी जागा मिळवण्याची डोकेदुखी बंद करण्यासाठी, सरकारने यावर जालीम उपाय काढायचं ठरवलंय. थेट पाण्यावरच एअरपोर्ट बनवण्यासाठी सरकारने कंबर कसलीय.

अवघ्या तीन मिनिटांत गाठा... सहार एअरपोर्ट!

Last Updated: Thursday, January 2, 2014, 15:22

कुर्ल्यातील ‘एमटीएनएल’ या रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सुरू झाल्यामुळे साकीनाका ते सहार एअरपोर्टपर्यंतचे अंतर अवघ्या तीन मिनिटांत पार पाडणे वाहन चालकांसाठी शक्य झाले आहे.

जगातील सर्वात उंच विमानतळ चीनमध्ये सुरू!

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 11:32

चीननं जगातील सर्वात उंच सिव्हिलियन एअरपोर्ट नुकतंच सुरू केलंय. यामुळे चीनला पश्चिम क्षेत्रात फक्त पर्यटनालाच वाव मिळणार नाही तर राजनैतिक पकडही घट्ट होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.

मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे राहणार बंद

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 15:56

ऑक्टोबर महिन्यापासून मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे बंद राहणार आहे. बांधकामासाठी हा रनवे बंद ठेवण्यात येणार असून ऑक्टोबरपासून पुढील सात महिने म्हणजेच मे 2014 पर्यंत मुख्य रनवे बंद राहणार आहे.

रणबीर कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा...

Last Updated: Saturday, May 4, 2013, 13:54

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. लंडनहून परतताना ड्यूटी फ्री सामान घेऊन येणाऱ्या रणबीर कपूरला काल रात्री मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

गगनची पुण्यात भव्य मिरवणूक

Last Updated: Thursday, August 9, 2012, 03:47

ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या गगन नारंगचं पुणे एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

लंडनच्या हिथ्रोवर बर्फवृष्टीचे थैमान

Last Updated: Monday, February 6, 2012, 10:53

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर बर्फवृष्टीमुळे रविवारी रात्री १३०० विमानोड्डणांपैकी जवळपास अर्धी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये मुंबईला जाणारी फ्लाईटसही होती.

धकधक गर्ल धडकली मुंबईत..

Last Updated: Saturday, October 8, 2011, 16:31

लाखो दिलो की धडकन, म्हणजेच आपली धकधक गर्ल माधुरी दिक्षीत– नेने ही मुंबईत परतली आहे ते सुद्धा कायमची. माधुरीने संपूर्ण कुटूंबाबरोबर मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्टिनेन्टल फ्लाईट- 48 या विमानानं माधुरी मुंबईतल्या विमानतळावर पोहोचली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला.