लता मंगेशकरांचाच जय(प्रभा)!

Last Updated: Sunday, July 14, 2013, 08:19

सध्या लता मंगेशकर यांच्या मालकीच्या असलेल्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडीओ संदर्भातील याचिका कोल्हापुर सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

जयप्रभा स्टुडिओसंदर्भात लता मंगेशकर यांना दिलासा

Last Updated: Thursday, February 21, 2013, 17:43

जयप्रभा स्टुडिओसंदर्भातल्या खटल्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी लता मंगेशकर यांची मालकी असलेल्या जयप्रभा स्टुडिओतील काही जमीन निवासी आणि इतर वापरासाठी खुली करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता.

‘जयप्रभा’ हेरिटेज नाही... लतादीदी जिंकल्या

Last Updated: Thursday, October 18, 2012, 10:05

‘जयप्रभा’ स्टुडिओवर महापालिका, चित्रपट महामंडळ किंवा इतर सिने व्यावसायिकांचा कोणताही हक्क नसल्याचं सांगत कोल्हापूरच्या दिवाणी कोर्टानं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा दावा फेटाळून लावलाय.

‘जयप्रभा’नं धुडकावले न्यायालयाचे आदेश…

Last Updated: Monday, October 8, 2012, 12:40

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. विक्री व्यवहारामुळे वादग्रस्त ठरलेल्या जयप्रभा स्टुडिओचे कामकाज ‘जैसे थे’ ठेवण्याचे कोर्टाचे आदेश धुडकावून लावत रविवारी रात्रीपासून इथं साहित्य हलवण्यास सुरुवात झालीय.

कोल्हापूरकरांचा जय(प्रभा)

Last Updated: Sunday, September 9, 2012, 18:52

कोल्हापुरात जयप्रभा स्टुडियोच्या खरेदीचा व्यवहार रद्द झालाय. स्टुडीओ खरेदी करणारे पोपट गुंदेचा यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केलीय. 11 कोटींना हा स्टुडिओ विकला जाणार होता. जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले. चित्रपटसृष्टीचा हा मानबिंदू अखेर सुरक्षित राहिलाय.

जयप्रभा स्टुडिओ विक्रीस सध्या स्थगिती

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 16:50

जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा वाद कोर्टात गेल्यावर दिवाणी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत विक्रीची कोणतीही प्रक्रिया करू नये ,` असा आदेश दिला आहे. न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी सोमवारी आदेश दिला. या आदेशामुळे लता मंगेशकर यांना जयप्रभा स्टुडियो सध्यातरी विकता येणार नाही.

लता मंगेशकरांना कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Friday, August 31, 2012, 20:36

जयप्रभा स्टुडिओ विक्रीप्रकरणी कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं गानसम्राज्ञी लता मंगशकर यांना नोटीस पाठवलीय.

कोल्हापूरकरांचा लतादीदींविरोधात मोर्चा

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 12:34

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकल्याबद्दल कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा निषेध व्यक्त केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर दोघांनाही कोल्हापूर पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे.

`जयप्रभा स्टुडिओ`ची अखेर विक्री

Last Updated: Saturday, August 25, 2012, 17:45

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकला गेलाय. मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला हा स्टुडिओ 11 कोटी रुपयांना विकला गेलाय. कोल्हापूरसाठी मानबिंदू असलेल्या या स्टुडिओची विक्री झाल्याने कोल्हापूरकर मात्र नाराज झाले आहेत.