इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

Last Updated: Sunday, June 22, 2014, 19:53

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.

टीम इंडियानं वनडेनंतर टेस्ट सीरिजही गमावली

Last Updated: Monday, December 30, 2013, 21:41

डर्बन टेस्टमध्ये टीम इंडियाला मानहानीकारक पराभवाला सामोर जाव लागलं आहे. सेकंड इनिंगमध्ये भारतीय टीम इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मायदेशात शेर ठरलेले भारतीय बॅट्समन आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर ढेर ठरले.

टीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!

Last Updated: Sunday, December 15, 2013, 17:52

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. आता त्याची परतफेड टेस्ट सीरिजमध्ये करण्याचं आव्हान यंगिस्तानसमोर असणार आहे. तर दुसरीकडे १८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकन बॅट्समन भारतीय बॉलिंगची पीसं काढण्यास उत्सुक असतील. त्यामुळंच कॅप्टन धोनीनं आता सचिनकडून बॉलिंगची तयारी करून घेतली आहे.

... आणि सचिन नाराज झाला

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 08:47

मास्टर ब्लास्टरच्या ईडन गार्डनवरील अखेरच्या मॅचसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं (कॅब) जय्यत तयारी केलीय. मात्र १९९व्या टेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या तयारीवर सचिन तेंडुलकर नाराज झालाय. वेस्टइंडिज सोबत दोन टेस्ट मॅचपैकी पहिली मॅच ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन वर सुरू होतेय.

वेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवड

Last Updated: Thursday, October 31, 2013, 11:28

सचिनच्या निरोपाच्या मॅचसाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. म्हणजेच वेस्ट इंडीज टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया आज निवडली जाईल. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत संदीप पाटील आणि कंपनीसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो बॉलर्सचाच.

युवराजला ठरवू दे त्याला काय करायचं ते - धोनी

Last Updated: Thursday, November 1, 2012, 15:44

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने म्हटंल आहे की, युवराज सिंग ज्याने कँन्सरसारख्या रोगाशी लढा देऊन त्यावर विजय मिळविला.