आफताब शिवदासानी विवाहबंधनात अडकला

Last Updated: Thursday, June 12, 2014, 17:40

अभिनेता आफताब शिवदासानी आपली गर्लफ्रेंड निन दुसांझ हिच्यासोबत विवाहबद्ध झालाय. या दोघांनी नक्की केव्हा लग्न केलं हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, सध्या दोघेही हनीमूनला गेल्याचं समजतंय.

`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार

Last Updated: Sunday, May 11, 2014, 18:27

`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

यंदा देशात सरासरीच्या कमी पाऊस - आयएमडी

Last Updated: Thursday, April 24, 2014, 22:08

यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.

दादर रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी, कडेकोट बंदोबस्त

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 13:50

दादर रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी काही घातपात होण्याची शक्यता असल्याचा निनावी फ़ोन पुणे रेल्वे पोलीसांना सकाळी आलाय. त्यामुळे दादर स्थानकावर बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

युनिनॉरची मुंबईतील मोबाईल सेवा कायमची बंद

Last Updated: Sunday, February 17, 2013, 10:47

युनिनॉर या मोबाईल सेवा कंपनीची मुंबईतील सेवा बंद झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीनं आपली सेवा बंद केली आहे.

सुप्रीम कोर्टाने सर्व 2G लायसन्स केली रद्द

Last Updated: Thursday, February 2, 2012, 17:29

सर्वोच्च न्यायालयाने 2G स्पेक्ट्रम लायसन्स रद्द केली आहेत. माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांच्या काळात देण्यात आलेली सर्व १२२ लायसन्स रद्द करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने खटला विशेष न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले आहेत.