`उपरा`कार लक्ष्मण मानेंना न्यायालयीन कोठडी

Last Updated: Monday, April 15, 2013, 14:16

बलात्काराची तक्रार असलेल्या `उपरा`कार लक्ष्मण माने यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावलीये. शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचा-यांवर बलात्कार केल्याप्रकरणी माने यांच्यावर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

माने सरेंडर होण्यापूर्वी...

Last Updated: Monday, April 8, 2013, 23:54

बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अखेर लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले....सरेंडर होण्यापूर्वी माने यांनी झी २४तासवर आपली बाजू मांडलीय...या सगळ्या प्रकरणावर माने यांचं काय म्हणणं आहे?

लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण

Last Updated: Monday, April 8, 2013, 17:50

बलात्काराचे आरोप झालेले उपराकार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले आहेत. तब्बल पंधरा दिवसांनंतर माने सातारा पोलिसांसमोर शरण आले आहेत. आपण फरार नव्हतोच असा अजब दावा मानेंनी केला आहे.

लक्ष्मण माने यांच्याविरोधात सहावी तक्रार

Last Updated: Sunday, April 7, 2013, 12:47

‘उपरा’कार आणि भारतीय भटके विमुक्त विकास संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याविरोधात अत्याचाराची सहावी तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

`उपराकार` लक्ष्मण माने फरार, बलात्काराचे आरोप

Last Updated: Thursday, March 28, 2013, 10:36

शारदाबाई आश्रम शाळेचे कार्याध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर आणखी दोन महिलांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

माजी आमदार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 12:40

`उपरा` या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायमस्वरूपी स्वयंपाकीण म्हणून घेतो असे सांगून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 13:05

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.