राज ठाकरे वामनराव यांच्या कुटुंबांच्या भेटीला

Last Updated: Monday, June 4, 2012, 09:47

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सदगुरू वामनराव पै यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. निरुपणकार वामनराव पै यांचं नुकतच निधन झालं. त्यादरम्यान राज ठाकरे ताडोबा दौऱ्यावर होते. मात्र, ताडोबा दौऱ्यावरून मुंबई परततताच त्यांनी वामनराव पै यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं.

वामनराव पै यांचा जीवनप्रवास

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 12:03

जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं. एक नजर टाकूयात सदगुरु वामनराव पै यांच्या जीवनप्रवासावर.

'जीवनाचा शिल्पकार' हरपला

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 23:02

जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पै यांनी 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं. आजारपणामुळे त्यांच्यावर गेल्या काही काळापासून कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 13:50

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या थोर उपदेशातून घरोघरी पोहचलेले सदगुरू वामनराव पै यांच्या निरूपणामधून पिंपरी-चिंचवडचे भाविक नादमय झाले होते. पिंपरी-चिंचवडमधील नागरिक सध्या अनुपम भक्तीरसात न्हाऊन निघाले आहेत.