धक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्त

Last Updated: Saturday, December 21, 2013, 13:43

एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्हऐवजी ‘ए’ निगेटिव्ह रक्त दिल्याची घटना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलीय. ठाण्यातल्या वाडा इथं सोनू पांडे नावाचा मुलगा गेल्या १० वर्षापासून भिवंडी सुधारगृहात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत सोनूच्या पोटातील आतड्यांना गँगरींग झाल्याचं समजलं. त्यामुळं त्याचं ऑपरेशन करावं लागलं.

रात्रीच्या वेळी रुग्णांनी करायचं काय?

Last Updated: Sunday, November 17, 2013, 22:54

पालघर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र रात्रीच्या वेळी बंद असल्याची गंभीर बाब झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळं आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या आरोग्य खात्याला जाग कधी येईल हा प्रश्नच आहे.

सिव्हिल हॉस्पिटल की मृत्यूचं दार?

Last Updated: Sunday, August 19, 2012, 12:33

ठाण्यातलं सिव्हील हॉस्पीटल नवजात बालकांसाठी मृत्यूचे दार ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या सात महिन्यांत या हॉस्पीटलमध्ये तब्बल 78 बालकांचा मृत्यू झालाय.

२०० रूपयांसाठी मुलीचा गेला जीव

Last Updated: Thursday, July 26, 2012, 14:19

देशातील आरोग्य यंत्रणेचा पुन्हा एकदा बोजवारा उघड झाला आहे. केवळ २०० रूपये नसल्याने आईवडिलांना आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला गमवावे लागले आहे. ही घटना घडली आहे पंजाबमध्ये. सहा दिवसांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी २०० रूपयांची गरज होती.

ठाण्यात रुग्णालाच काढले हॉस्पिटलबाहेर

Last Updated: Friday, March 30, 2012, 08:06

अपघातात ५० टक्के भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पिटलबाहेर काढल्याचा धक्कादाक प्रकार ठाण्यातल्या जिल्हा रुग्णालयात घ़डला आहे. दुस-या एका रुग्णाला जागा हवी आहे म्हणून भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पीटलबाहेर काढल्याचं कारण देण्यात आले.

रुग्णाचा मृत्यू, हॉस्पीटलमध्ये गोंधळ

Last Updated: Friday, February 24, 2012, 13:39

सांगलीच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पीटलमध्ये घुसून गोंधळ घातला. इतकच नाही तर आपला हलगर्जीपणा दडवण्यासाठी हॉस्पीटल प्रशासनाने त्या रुग्णाचा मृतदेह बेवारस दाखवला. याप्रकरणी डॉ. ललित मोहन आणि डॉ.प्राची निर्मळे या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.